Sanju Rathod esakal
Premier

Sanju Rathod: 'गुलाबी साडी' नंतर आता 'Bride तुझी नवरी'; संजू राठोडच्या नव्या गाण्याची चर्चा

Sanju Rathod: गुलाबी साडी या गाण्यावर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. आता गुलाबी साडी या गाण्यानंतर संजू राठोडचं 'Bride तुझी नवरी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

priyanka kulkarni

Sanju Rathod: सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असतानाच हळदी समारंभात स्पेशल गाण्यांवर वऱ्हाडी मंडळी ठेका धरताना दिसतात. यातच भर घालत आता यापुढील हळदी समारंभात आणखी एक ठसकेबाज गाणं नेहमी वाजणार. या गाण्याच्या प्रोमोने सर्वांची उत्सुकता अधिक वाढवून ठेवली होती. यंदाच्या हळदी समारंभाला गायक संजू राठडेचे (Sanju Rathod) 'Bride तुझी नवरी' (Bride Tujhi Navri) हे गाणं वऱ्हाडी मंडळींना थिरकायला भाग पाडणार हे नक्की.

'गुलाबी साडी' या गाण्याची जगभरात क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडीवर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. कलाकार मंडळींपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला या गाण्याने भुरळ घातली आहे. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड केलं. आता या गाण्याच्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोड आणि 'बिग हिट मीडिया' नवकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहे. यंदाच्या हळदी समारंभात हे गाणं आवर्जून वाजेल याची खात्री आहे.

पाहा व्हिडीओ:

नितीश चव्हाण आणि वैष्णवी पाटीलची केमिस्ट्री

'Bride तुझी नवरी' या गाण्यात 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असून संजू राठोडच्या रॅपने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तर या गाण्यात सहकलाकार म्हणून हृतिक मनी आणि निमरित मनी यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय. 'Bride तुझी नवरी' हे गाणं संजू राठोडचं असून 'बिग हिट' मीडिया प्रस्तुत आहे. निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. तर गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनिष महाजन याने उत्तमरित्या पेलली आहे. गाण्याचे बोल संजू राठोडचे असून हे गाणं संजूसह आनंदी जोशी हिने गायलं आहे. तर संगीताची संपूर्ण जबाबदारी गौरव राठोड (G-Spark) याने सांभाळली आहे. गुलाबी साडी नंतर आता संजूच्या 'Bride तुझी नवरी' या आगामी गाण्याची क्रेझ वाढत असलेली पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष रांका यांच्यावर हल्ला; ‘भाजपच्या गुंडांकडून सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण’ - अभिजीत दिपके यांचा आरोप

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT