Gulabi Sadi esakal
Premier

Gulabi Sadi: पाकिस्तानातही पोहोचली 'गुलाबी साडी', लग्नात वाजलं गाणं...व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

Gulabi Sadi: नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडी पाकिस्तानातील लग्नसोहळ्यात गुलाबी साडी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Gulabi Sadi: 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्यावर रिल शूट करुन अनेक जण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene), रेमो डिसूजा Remo D'Souza) आणि मुंबई इंडियन्स टीममधील खेळाडू या गाण्यावर थिरकले आहेत.अशातच आता या गाण्याची क्रेझ पाकिस्तानात देखील बघायला मिळत आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडी पाकिस्तानातील लग्नसोहळ्यात गुलाबी साडी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

पाकिस्तानातही पोहोचली 'गुलाबी साडी'

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडी लग्नसोहळ्यात गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 'गुलाबी साडी गाण्यावर पाकिस्तानी मराठी वेडिंगमध्ये डान्स केला', असं या व्हिडीओवर लिहिलं दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

व्हायरल झालेल्या व्हिडीओला गुलाबी साडी गाण्याचा गायक संजू राठोडनं कमेंट केली आहे. त्यानं या व्हिडीओला 'खूप छान', अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "खूप मस्त भावा".

पाहा व्हिडीओ:

स्टेडियममध्ये संजूनं गायलं 'गुलाबी साडी' गाणं

काही दिवसांपूर्वा एका आयपीएल मॅचदरम्यान संजू राठोडनं प्रेक्षकांसाठी स्टेडियममध्ये 'गुलाबी साडी' हे गाणं गायलं. स्टेडियममधील व्हिडीओ संजून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'चला, क्राऊड ते क्रिएटर बॉक्स पर्यंत'

संजू राठोडच्या गुलाबी साडी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियन्सपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. गुलाबी साडी गाण्याआधी संजू राठोडनं नऊवारी पाहिजे आणि बाप्पा वाला गाना ही गाणी देखील गायली. त्याच्या या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganesh Visarjan 2025 : लालबागच्या राजासह मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी सज्ज; सकाळपासूनच सुरू होणार मिरवणुका!

GST Reduction: आनंदाची बातमी! जीएसटी कपातमुळे शैक्षणिक खर्च कमी; स्टेशनरी आणि पुस्तकांसह इतर वस्तू होणार स्वस्त

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात सकाळी ९ वाजता गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Asian Hockey Cup 2025 : भारतीय महिलांचा दणदणीत विजय; थायलंडचा ११-० ने धुव्वा

SCROLL FOR NEXT