Gunratna Sadavarte with a donkey on Bigg Boss sparks controversy, prompting PETA to take action. Esakal
Premier

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या गाढवामुळे सलमान आला अडचणीत! बिग बॉसला आली कायदेशीर नोटीस, काय हा प्रकार ?

Gunratna Sadavarte Donkey: पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) ने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे.

आशुतोष मसगौंडे

PETA notice to Salman Khan over donkey incident in Bigg Boss:

छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' हिंदीचा नवा सीझन ६ ऑक्टोबरपासून सुरू झाला. यावेळी सलमान खानच्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये १८ स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे. विशेष म्हणजे, यावेळी एक गाढवदेखील 'बिग बॉस'च्या घराचा भाग बनले आहे; पण आता बातमी येत आहे की, या गाढवामुळे 'बिग बॉस'च्या मेकर्सच्या अडचणीत वाढ होणार आहे.

पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) ने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे सांगितले जात आहे.

'बिग बॉस'च्या ग्रैंड प्रीमियरदरम्यान, सलमानने या गाढवाला 'गधराज' म्हणून ओळख करून दिली होती आणि त्याला घरात प्रवेश दिला होता. रिपोर्टनुसार, पेटा इंडियाच्या अ‍ॅडव्होकेसी असोसिएट शौर्य अग्रवाल यांनी 'बिग बॉस'च्या निर्मात्यांना पत्र लिहून शोमध्ये गाढवाच्या वापरावर आक्षेप नोंदवला आहे.

त्यांनी सांगितले की, "या प्रकरणाबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी येत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्राण्यांचे संरक्षण लक्षात घेऊन गाढवाला शोमधून सोडण्यात यावे आणि पेटा इंडियाकडे सोपवावे, जेणेकरून त्याला इतर गाढवांसोबत अभयारण्यात ठेवता येईल." यासाठी त्यांनी सलमानलाही विनंती केली आहे.

धक्कादायक दावे

दरम्यान हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या गुणरत्न सदावर्तेंनी घरात अनेक धक्कादाय दावे केले आहेत. बिग बॉच्या घरात आल्याआल्याच सदावर्तेंनी दावा केला होता की, त्यांना दाऊद इब्राहीमची धमकी आली होती.

पुढे गुणरत्न सदावर्तेंनी असाही दावा केली होता की, ते मुंबईवर राज करतात. व मुंबईती तीनच शक्तीकेंद्रं आहेत, एक उद्धव ठाकरे, दुसरे शरद पवार आणि तिसरे गुणरत्न सदावर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT