ashvini bhave  sakal
Premier

Ashvini Bhave: मला इंडस्ट्रीमधला नवरा नकोच होता... अश्विनी भावेंचा खुलासा; म्हणाल्या- मी ज्या संस्कारात...

Ashvini Bhave On Husband: लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नावर भाष्य केलं आहे. आपल्याला इंडस्ट्रीमधील नवरा नको होता असं त्या म्हणाल्या आहेत.

Payal Naik

Ashvini Bhave Talked On Marriage: मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची कमाल दाखवणाऱ्या अश्विनी भावे यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्यांनी आपल्या नृत्यानेही चाहत्यांना भुरळ पाडली. मात्र यशाच्या शिखरावर असताना त्यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला आणि नवऱ्यासोबत त्या परदेशात स्थायिक झाल्या. त्यानंतर त्या अनेक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. मला इंडस्ट्रीमधील नवरा नकोच होता असं त्यांनी सांगितलं.

अश्विनी यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या, 'मी लहानाची मोठी झाले ना ती खूप बाळबोध संस्कारांमध्ये झाले. आणि माझ्या पहिल्या नाटकालाच मी पहिल्यांदा दारूची बाटली पाहिली. मला म्हणजे असं झालं की काय करू. एक आपली वेगळी देहबोली असते. मी खूप वेगळ्या संस्कारांमधून आले होते. आणि मला ते संस्कार सोडावे असं कधीच वाटलं नाही. त्यामुळे मी आजूबाजूला जे पाहिलं किंवा एक वाईट वागणूक देण्याजी किंवा छेडण्याची पद्धत असते. हे सगळं मी इथे पाहिलं.'

अश्विनी पुढे म्हणाल्या, 'मला नाही माहीत का पण मी या इंडस्ट्रीकडे कायम ही माझी कामाची जागा आहे असं बघत आले. म्हणजे माझा स्वभाव होता. मला असं हे कुणी सांगितलं नव्हतं. माझं मीच ठरवलेलं होतं. की भले त्याने माझ्या कामातलं काहीही नसलं पाहिलं तारिकाही फराज पडत नाही. मला तो माणूस म्हणून पटावा, त्याला मी माणूस म्हणून पटावी एवढीच अपेक्षा होती. मला नाही माहीत हे कदाचित ऐकून विचित्र वाटेल की मला इंडस्ट्रीतला नवरा नको होता हे माझं आधीच ठरलेलं.' अश्विनी या सध्या 'घरत गणपती' या चित्रपटात दिसत आहेत. हा चित्रपट २६ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अश्विनी यांनी यापूर्वी 'ध्यानीमनी', 'कदाचित', 'आजचा दिवस', 'पुरुष', 'वजीर', 'शाब्बास सुनबाई' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT