Hamare Baarah sakal
Premier

Hamare Baarah: सौंदर्यामुळे अनेकवेळा झाली रिजेक्ट, पहिल्याच चित्रपटामुळे येतायत बलात्काराच्या धमक्या; अभिनेत्रीनं सांगितले धक्कादायक अनुभव

Aditi Dhiman on Hamare Baarah: अदितीनं 'हमारे बारह' या चित्रपटाच्या वादाबद्दल आणि तिला आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं.

priyanka kulkarni

Hamare Baarah: 'हमारे बारह' (Hamare Baarah) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा अनेकजण विरोध करत आहेत. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट शेअर करुन या चित्रपटाचा विरोध केला होता. अशातच या चित्रपटातील कलाकार आता चर्चेत आले आहेत. 'हमारे बारह' या चित्रपटात चित्रपटात अन्नू कपूर यांची मुलगी जरीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती धीमननं (Aditi Dhiman) या चित्रपटामुळे तिला आलेल्या अडचणींबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे. 'हमारे बारह' या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादामुळे अदितीला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

अदिती धीमन ही 'हमारे बारह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पण तिचा पहिलाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आजतक डॉट इनला दिलेल्या मुलाखतीत अदितीनं 'हमारे बारह' या चित्रपटाच्या वादाबद्दल आणि तिला आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं.

'हमारे बारह' चित्रपटाच्या वादाबद्दल काय म्हणाली अदिती?

'हमारे बारह' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अदितीला आलेल्या धमक्यांबद्दल तिनं मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, "घरातील लोक खूप घाबरले होते. मला बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या. मी माझ्या घरातील लोकांना याबद्दल सांगत नव्हते मला वाटत होतं की, ते नाराज होतील. पण त्यांना हे सर्व बातम्यांमधून कळालं. त्यामुळे ते मला घरी येण्यास सांगत होता. मग मी फक्त आईला सांगितले की, मी काही चुकीचे केले नाही मग मी कशाला घाबरू. तुमच्या मुलीने काहीही चूक केलेली नाही, असं माझ्या कुटुंबाला मी सांगितलं. आई, तू फायटरची बायको आहेस, ग्राउंड लेव्हल सत्य लोकांना दाखवणं किती महत्त्वाचं आहे याचा विचार कर, असं मी माझ्या आईला सांगत होते. तुम्ही मनोरंजनासाठी सिनेमे बघायला जाता, ॲनिमलसारखे सिनेमे हिट बनवता. मग अशा वास्तविक समस्या असलेल्या चित्रपटांपासून दूर का राहायचे?"

आदिती बंगळुरूची आहे, तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. तिचे वडील हवाई दलात होते, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर अदितीचं आयुष्य बदललं. वडिलांचे निधन झाले तेव्हा अदिती 11 वर्षांची होती. वडिलांच्या निधनाबद्दल मुलाखतीत अदितीनं सांगितलं, "वडिलांच्या निधनानंतर मी पुन्हा कधी अभिनय करू शकेन हा विचारच सोडून दिला होता. मी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं, बी.कॉम करत होतो. कॉलेजमध्ये फ्रेश फेसची स्पर्धा होती, मी त्यात भाग घेतला आणि ती स्पर्धा मी जिंकले होते. तेव्हा माझी एक मुलाखत झाली, या मुलाखतीचा लेख प्रकाशित झाला, मग माझ्या आई आणि भावाने ते पाहिले आणि त्यांनी मला सांगितले की, तू या क्षेत्रात काम कर"

सौंदर्यामुळे ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट

अदितीने सांगितले की, तिच्या सौंदर्यामुळे तिला अनेक वेळा ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलं होतं. याबद्दल ती म्हणाली, "ऑडिशनमध्ये मला अनेकवेळा रिजेक्ट करण्यात आलं. तू चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीपेक्षा सुंदर आहेस म्हणून तुला कास्ट करता येणार नाही, असे सांगून अनेक वेळा मला रिजेक्ट करण्यात आलं आहे. ज्या लोकांना वाटते की, केवळ सुंदरतेमुळे तुम्हाला काम मिळू शकते, त्या लोकांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. कारण असे घडत नाही. मेहनत करणे आवश्यक आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT