pallavi subhash with mother sakal
Premier

Marathi Actress Mother's Death: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मातृशोक; आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते-

Marathi Actress Mother's Death: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या आईचं नुकतंच निधन झालं आहे. तिने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगात आपल्या मुलांना सगळ्यात जास्त जीव लावणारी व्यक्ती म्हणजे आई. आई नसेल तर घरही रिकामं वाटतं. आईचं आयुष्यातून निघून जाणं म्हणजे अर्ध जग संपण्यासारखं आहे. हीच वाईट परिस्थिती एका मराठी अभिनेत्रीवर ओढवली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाष हिच्या आईचं नुकतंच निधन झालं आहे. आईच्या निधनाने तिच्यासह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पल्लवीने एक पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. तर आईच्या आठवणीत ती व्याकुळ झाली आहे.

पल्लवीने आईसोबतचा एक फोटो शेअर केला आणि पोस्ट करत लिहिलं, 'आई, काल सूर्य मावळत असताना मी स्वतःला आपण शेअर केलेल्या असंख्य गोष्टींची आठवण करून देत होते. तुझं अतूट प्रेम, तुझा हळुवार स्पर्श, तुझा सांत्वन देणारा स्पर्श माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आज, जेव्हा मी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाचा प्रवासात अनुभवत आहे, तेव्हा मला तुझी शक्ती, तुझी आणि तुझ्या निस्वार्थ पाठिंबा या गोष्टींची आठवण येत आहे. तुझ्या प्रत्येक शब्दात खरेपणा व आपलेपणा होता.

आई तु कायम राहशील

तिने पुढे लिहिलं, 'मला माहीत आहे की तू माझ्यावर लक्ष ठेवून आहेस. तुझं प्रेम प्रत्येक नवीन दिवसाला धैर्याने सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतं आणि याचं मला समाधान आहे. आपण एकमेकांबरोबर घालवलेल्या आठवणींना जवळ घेऊन वेळेच बंधन तोडून आपण लवकरच एके दिवशी परत भेटू याची मला खात्री आहे. तुझं प्रेम माझ्या हृदयात कायम असेल. आपण एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाची मी जाणीव ठेवेन. तुझी कायम आठवण येईल, तुझ्यावर मी कायम प्रेम करत राहीन.' अनेक नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर पल्लवीचं सांत्वन केलं आहे. ‘कुंकू झालं वैरी’, ‘आयला रे’, ‘तुझं माझं जमेना’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘हॅप्पी जर्नी’ यांसारख्या चित्रपटात पल्लवी झळकलेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Haridwar: कांवड भक्तांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी; मुख्यमंत्र्यांनी पाय धुवून केले स्वागत, video viral

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

दोघात तिसरा! अमृता आणि हिमांशूच्या नात्यात 'त्या' व्यक्तीमुळे दुरावा? नेटकऱ्यांनी थेट अभिनेत्याचं नावच घेतलं; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT