Maggie Smith ESakal
Premier

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maggie Smith Death: 'हॅरी पॉटर' चित्रपटात प्रोफेसर मिनर्व्हा मॅकगोनागलच्या भूमिकेत वाहवा मिळवणारी हॉलिवूड अभिनेत्री मॅगी स्मिथ यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षीय स्मिथ यांनी शुक्रवारी पहाटे लंडनच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेऊन जगाचा कायमचा निरोप घेतला.

Vrushal Karmarkar

तुम्ही हॅरी पॉटर चित्रपट पाहिला असेल, तर प्रोफेसर मॅक्गोनागलच्या व्यक्तिरेखेची आठवण तुमच्या मनात नक्कीच असेल. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ हिच्याबद्दल खूप वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. डेम मॅगी स्मिथ यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत डेम मॅगी स्मिथच्या नावाचाही समावेश होता. रुपेरी पडद्यावर त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्या प्रसिद्ध होत्या. अशा परिस्थितीत आता त्यांचे निधन झाल्याने हा इंग्रजी चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. वाढत्या वयोमानामुळे त्या दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होत्या आणि शुक्रवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाहे आहे.

त्या त्यांचे दोन मुलगे आणि 5 नातवंडांसह राहत होती. डेम मॅगी स्मिथच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात ही सर्व माहिती देण्यात आली आहे. हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील या ज्येष्ठ अभिनेत्रीचे योगदान कधीही विसरता येणार नाही. डेम मॅगी स्मिथ 1952 ते 2023 या काळात अभिनेत्री सिनेविश्वात सक्रिय होत्या. या काळात त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. पण हॅरी पॉटरमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्यांनी दोनदा ऑस्कर पुरस्कारही जिंकला होता. 1970 मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी आणि 1978 मध्ये कॅलिफोर्निया सूट सारख्या चित्रपटांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT