Heeramandi Song esakal
Premier

Heeramandi Song: सोनाक्षीच्या दिलखेच अदा अन् बिनधास्त डान्स; 'हिरामंडी' मधील 'तीलस्मि बाहें' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Heeramandi Song: सध्या सोशल मीडिया 'हिरामंडी' या वेबसिरीजचं दुसरं गाणं गाजवतंय. 'तीलस्मि बाहें' असं या गाण्याचं नाव असून सध्या या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

priyanka kulkarni

Tilasmi Bahein: संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) हे नाव ऐकलं कि सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्यांनी बनवलेल्या भव्यदिव्य आणि एकापेक्षा सुंदर एक फिल्म्स. भव्यदिव्य सेट्स, मनाला मोहवणारं संगीत आणि तितकंच भारी कथानक ही भन्साळींच्या कलाकृतींची खासियत. काही महिन्यांपूर्वी भन्साळींनी त्यांच्या पहिल्या भव्यदिव्य वेबसिरीजची घोषणा केली आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हिरामंडी द डायमंड बझार ही भन्साळींची बहुचर्चित वेबसिरीज लवकरच नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळातील तवायफांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या वेबसीरिजच्या टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि आता सध्या सोशल मीडिया गाजवतंय या वेबसिरीजचं दुसरं गाणं. 'तीलस्मि बाहें' असं या गाण्याचं नाव असून सध्या या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर (Sonakshi Sinha) हे गाणं चित्रित झालं असून तिच्या दिलखेचक अदा, भन्नाट डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. चाळीशीच्या दशकातील सोनाक्षीचा लूक, तिच्या डान्सने प्रेक्षकांना मोहित केलं. शॅम्पेन कलरची सिक्वेन्स साडी, शॉर्ट कर्ली हेअर कट यामध्ये सोनाक्षी हॉट दिसतेय. 'तीलस्मि बाहें' हे एक पार्टी सॉन्ग असून सोनाक्षीचा बिनधास्त डान्स सगळ्यांनाच पसंत पडलाय. सोनाक्षी या वेबसिरीजमध्ये फरिदान ही भूमिका साकारत असून ती पहिल्यांदाच ग्रे शेडची भूमिका साकारणार असल्याचं म्हंटल जातंय. तिचा लूक, तिचा अभिनय सगळ्यांनाच भावलाय. या गाण्यात शेवटी तिची अदिती राव हैदरशी झालेली नजरानजर आणि त्यातून व्यक्त होणार द्वेष तिने मुद्राभिनयातून कमाल साकारलाय.

१ मे २०२४ ला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज रिलीज होणार आहे. या आधी वेबसिरीजचं सकल बन हे गाणं रिलीज झालं. हे गाणं संजय लीला भन्साळी यांनी स्वतः संगीतबद्ध केलं असून यात सगळ्या नायिकांच्या नृत्याने प्रेक्षकांना मोहित केलं.

'ही' आहे कास्ट:

या वेब सिरीज मध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजिदा शेख आणि शर्मीन सेहगल या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. या शिवाय फरीदा जलाल, वैष्णवी गणात्रा, अध्ययन सुमन, शेखर सुमन, श्रुती शर्मा हे कलाकार सुद्धा आहेत.

असं आहे कथानक:

स्वातंत्र्यपूर्व भारतातील लाहोर मधील सुप्रसिद्ध हिरामंडी बाजारातील तवायफांचं आयुष्य, सत्तेसाठी चढाओढ, स्वातंत्र्य लढ्याचे त्यांच्या आयुष्यावर झालेले परिणाम यावर ही सिरीज आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT