Heeramandi esakal
Premier

Heeramandi: दोन वर्षात संसार मोडला, कॅन्सरशी लढा अन् आता झाली 'मल्लिका जान'; 'हिरामंडी'मधील अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास

Heeramandi: 'हिरामंडी' या वेब सीरिजमधील भव्य दिव्य सेट्स तसेच या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

priyanka kulkarni

Heeramandi: सध्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या हिरामंडी (Heeramandi) या वेब सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही वेब सीरिज काल (1 मे) प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेब सीरिजमधील भव्य दिव्य सेट्स तसेच या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. अशातच या वेब सीरिजमध्ये 'मल्लिका जान' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मनिषा कोईरालाचं (Manisha Koirala) सध्या अनेकजण कौतुक करत आहेत. मनिषानं हिरामंडी या वेब सीरिजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे, असं अनेकजण म्हणत आहेत. मनिषानं हिरामंडी वेब सीरिजमधून दमदार कमबॅक केला आहे. पण या आधी मनिषाला बराच स्ट्रगल करावा लागला आहे. जाणून घेऊयात तिच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल...

दोन वर्षही टिकला नाही संसार

2010 मध्ये मनिषानं काठमांडूमधील उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्न केले. सम्राट आणि मनिषा यांच्यात 7 वर्षांचे अंतर होते. मनिषा ही सम्राट यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होती. सम्राट आणि मनिषा यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 2012 मध्ये सम्राट आणि मनिषा यांचा घटस्फोट झाला.

कॅन्सरवर केली मात

मनिषाला काही वर्षांपूर्वी गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. कर्करोगाच्या उपचारासाठी ती परदेशात गेली होती. मनिषाने चार वर्षांत कॅन्सरशी लढा दिला आणि त्यावर तिने मात देखील केली. तिच्या उपचारादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

'मल्लिका जान' होऊन प्रेक्षकांच्या मनावर गाजवतीये अधिराज्य

मनिषा ही हिरामंडी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजमधील तिच्या मल्लिका जान या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या वेब सीरिजचे आठ एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेब सीरिजमध्ये मनिषासोबतच अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांनी देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे महा एल्गार सभा

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; चिंतामणीला दिला निरोप

SCROLL FOR NEXT