Fardeen Khan esakal
Premier

Heeramandi The Diamond Bazaar: "याहुन चांगला कमबॅक असू शकत नाही"; हिरामंडीच्या प्रिमियरला फरदीनचे डोळे पाणावले

Fardeen Khan: तब्बल 14 वर्षानंतर फरदीन पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करतोय. हिरामंडीच्या प्रिमियरमध्ये याबद्दल बोलताना फरदीन भावूक झाला.

priyanka kulkarni

Heeramandi The Diamond Bazaar: हिरामंडी द डायमंड बझार (Heeramandi The Diamond Bazaar) या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं दिग्दर्शन असलेल्या ग्रँड वेबसीरिजच्या ट्रेलरने सगळ्यांचीच मनं जिंकली. स्वातंत्र्यपूर्व काळातील वेश्याव्यवसाय, सत्ताकारण आणि स्वातंत्र्य चळवळ यावर भाष्य करणाऱ्या या भव्यदिव्य वेबसिरीजची चर्चा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळाली आणि हा अभिनेता आहे फरदीन खान (Fardeen Khan). तब्बल 14 वर्षानंतर फरदीन पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करतोय.

काही दिवसांपूर्वी या वेबसिरीजमधील त्याचं लूक पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं होतं. या लूक पोस्टरने सगळ्यांची मनं जिंकलीच शिवाय फरदीन परत येणार म्हणून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकताही पाहायला मिळाली.

हिरामंडी द डायमंड बझार या वेबसिरींजचा ट्रेलर लाँच काल थाटात पार पडला आणि फरदीन यावेळी भावूक झाला. तो म्हणाला,"पहिलं म्हणजे हे माझ्या करिअरमधील खूप मोठं अंतर होतं. जवळपास १४ वर्षं मी इंडस्ट्रीपासून दूर होतो. संजय लीला भन्साळी सारख्या व्यक्तीबरोबर, एका उत्तम स्टारकास्टबरोबर आणि नेटफ्लिक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करायला मिळाल्याबद्दल मी अतिशय ऋणी आहे. मला नाही वाटतं कि मला कमबॅक करण्यासाठी याहून अधिक चांगली संधी मिळाली असती."

पुढे तो म्हणाला,"ही एक अशी भूमिका आहे जी या आधी मी कधीच केली नाहीये आणि ही माझ्यासही परफेक्ट भूमिका होती. मी ज्या वयात आता पुन्हा एकदा स्क्रीनवर कमबॅक करतोय त्या वयात आपण काही अनुभव घेतलेले असतात, आपले काही दृष्टिकोन तयार झाले असतात आणि संजयने ही सगळी पात्र लिहिली आहेत त्यांच्या पदरांमध्ये आपण आपलं योगदान देऊ शकतो. त्याने लिहिलेली पात्र अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असतात. अशी पात्र तोच लिहू शकतो. त्याच्यासोबत काम करणं कठीण आहे, परंतु त्याचवेळी आपण जेव्हा हे सगळं पाहतो तेव्हा आपल्याला त्याच्यामागचा अर्थ समजतो. मी आता खूप भावूक झालोय. मला ही संधी दिल्याबद्दल मी खूप ऋणी आहे." हे बोलताना त्याचे डोळे पाणावले. इन्स्टंट बॉलिवूडने फरदीनचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पहा व्हिडीओ:

या वेबसिरीजमध्ये फरदीनसोबत शेखर सुमन,सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, फरीदा जलाल, अध्ययन सुमन आणि शर्मिन सेहगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. १ मे २०२४ ला ही वेबसिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT