Heeramandi The Diamond Bazaar  esakal
Premier

Heeramandi The Diamond Bazaar: ठरलं! हीरामंडी 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, संजय लीला भन्साळींच्या मास्टरपीसची रिलीज डेट जाहीर

Heeramandi The Diamond Bazaar: हीरामंडी हा संजय लीला भन्साळी यांचा मास्टरपीस कधी रिलीज होणार? जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Heeramandi The Diamond Bazaar: प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांच्या चित्रपटांमधील भव्य-दिव्य सेट्स प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. लवकरच संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’  (Heeramandi The Diamond Bazaar) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. तसेच या चित्रपटातील सकल बन हे गाणं देखील रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हीरामंडी हा संजय लीला भन्साळी यांचा मास्टरपीस कधी रिलीज होणार? जाणून घेऊयात...

कधी रिलीज होणार हीरामंडी?

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित एका ड्रोन लाइट शो कार्यक्रमादरम्यान हीरामंडी वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. यावेळी, 1,000 ड्रोन आकाशात उडवण्यात आले. वेब सीरिजच्या स्टार कास्टसह भन्साळी प्रॉडक्शनच्या सीईओ प्रेरणा सिंग आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या मालिकेच्या संचालक तान्या बामी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हीरामंडी ही वेब सीरिज 1 मे रोजी रिलीज होणार आहे.

'हीरामंडी' ची स्टार कास्ट

‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती

हम दिल दे चुके सनम,देवदास,साँवरिया,गुजारिश,गोलियों की रासलीला राम-लीला,बाजीराव मस्तानी, पद्मावत या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांच्या पद्मावत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता त्यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Missing Minors : मुंबई हादरली ! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता; पोलिसांकडून विशेष शोधमोहीम सुरू, हाय अलर्ट जारी

Pune News: बारामतीत साकारणार अजित पवार यांचे स्मारक; शरद पवार यांची इच्छा, विद्या प्रतिष्ठान संकुलातील जागा!

Ladki Bahin Yojana : 'कोणीही माईका लाल आला, तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Pune News: राज्य शासनाचा माेठा निर्णय! भूसंपादनाची माहिती आता ऑनलाइन मिळणार; गैरप्रकाराला बसणार आळा..

Warren Buffett Index : दिशादर्शक वॉरेन बफेट निर्देशांक

SCROLL FOR NEXT