Maharaj Movie Esakal
Premier

Maharaj Movie Court Case : 'महाराज' सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगिती कायम ; कोर्ट आज फैसला सुनावणार ?

Maharaj movie court case : 'महाराज' सिनेमावरील स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय कोर्टाचा निर्णय घेणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Junaid Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लेक जुनैद खान बॉलीवूड मध्ये पदार्पण करतोय पण त्याचा सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यापूर्वीच वादात अडकलाय. जुनैद 'महाराज' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय नेटफ्लिक्स वर रिलीज होणारा हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे हिंदू संघटनेने याच्यावर बंदी आणण्यासाठी कोर्टात केस दाखल केलीये.

गुजरात हायकोर्टात या सिनेमावर केस दाखल करण्यात आली असून कोर्टाने मंगळवारी या सिनेमाच्या प्रदर्शनावर एक दिवसाची स्थगिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीश संगीता विषेन यांनी सिनेमा प्रदर्शनावरील स्थगिती एक दिवसाने वाढवली असून उद्या यशराज प्रॉडक्शन आणि नेटफ्लिक्स या सिनेमावरील बंदी हटवावी म्हणून त्यांची बाजू कोर्टात मांडलं जाणार आहे.

गेल्या आठवड्यात हा सिनेमा रिलीज होणार होता पण सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली गेली. शुक्रवारी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली गेली होती. १८६२ मधील घटनेवर हा सिनेमा आधारित असून या सिनेमामुळे पंथ आणि श्रद्धेबद्दल समाजात अराजकता निर्माण होईल असं मत याचिकाकर्त्यांनी मांडलं आहे. १८६२ साली ब्रिटिश न्यायालयात लढल्या गेलेल्या खटल्यावर हा सिनेमा आधारित असून हा खटला पत्रकार करसनदास मुळजी यांच्या पुष्टीमार्गी जदुनाथ महाराजांच्या स्त्री भक्तांशी असलेल्या लैंगिक संबंधांवरील लेखांवर आधारित होता.

तर सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांच्या बचावासाठी वकिलांनी त्यांच्या उत्तरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावा करण्यासाठी बँडिट क्वीन, पद्मावत, गंगूबाई काठियावाडी आणि फराज यांच्याशी संबंधित कायदेशीर लढाईचा उल्लेख केला आहे. तसंच नेटफ्लिक्सच्या वतीने वकील मुकुल रस्तोगी यांना सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमा प्रदर्शनासाठी योग्य ते प्रमाणपत्र मिळाल्याचं सांगितलं तसंच त्यांनी कोर्टाच्या ही गोष्टही लक्षात आणून दिली कि याचिकाकर्ते हे एक व्यापारी असून २०१३ मध्ये या सिनेमाच्या विषयासंबंधित जे पुस्तक प्रकाशित झालंय त्याबद्दल त्यांना काहीही माहित नव्हतं तसंच हे पुस्तक २०१३ साली प्रकाशित झाल्यानंतर असा कोणताही वाद निर्माण झाला नव्हता. पण जर हा सिनेमा प्रदर्शनापासून रोखला तर सिनेमाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांचं बरंच नुकसान होऊ शकतं.

दरम्यान, कोर्ट आज बचाव पक्षाची बाजू ऐकणार असून त्यानंतर फैसला सुनावणार आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होणार कि नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : राज्य सरकारच्या सेवा आणि योजना व्हॉट्सअपवर येणार - मुख्यमंत्री फडणवीस

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT