suraj chavan winning amount  esakal
Premier

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Winning Amount: लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता ठरला आहे. त्याला आता विजेता म्हणून नेमकी किती रक्कम मिळाली?

Payal Naik

लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' चा आज ग्रँड फिनाले पार पडला. टॉप ६ स्पर्धकांमधून सुरज चव्हाण याने आपला जलवा दाखवत या सिझनची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली आहे. झापून झुपुक सुरज चव्हाण याच्यावर आता चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या सीझनमध्ये विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यात सूरजला नेमकं काय काय मिळालंय आणि त्याला विजेता म्हणून किती रक्कम मिळाली आहे ते जाणून घेऊया.

'बिग बॉस मराठी ५' च्या विजेत्याची रक्कम २५ लाख होती. मात्र घरात खेळल्या गेलेल्या टास्कमुळे ही रक्कम कमी होऊन ८ लाखांवर आली होती. मात्र पुन्हा ही रक्कम २५ लाख करण्यात आली. त्यानंतर जान्हवी त्यातील ९ लाख घेऊन घराबाहेर झाली. आता सूरजला अखेर १४ लाख रकमेचा चेक मिळाला आहे. तर त्याला इ स्कुटर देखील देण्यात आली आहे. तर यासोबतच पु ना गाडगीळ यांच्याकडून १ लाखांच दागिने खरेदी करण्यासाठी व्हाऊचर देण्यात आलं आहे. या सर्व भेटवस्तू विजेत्याला मिळाल्या आहेत.

अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: खुनी सुधारू शकतो, पण सायबर गुन्हेगारांना जामीन नाही! सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, देशभरात खळबळ

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT