dangal movie  esakal
Premier

'दंगल'साठी फोगाट कुटुंबाला किती पैसे मिळाले होते? बबिता फोगाटने सांगितला आकडा, म्हणाली- बाबा म्हणालेले...

Babita PhogatReveal How Much Phogat Family Get For Dangal: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा 'दंगल' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हा चित्रपट फोगाट कुटुंबावर आधारित होता.

Payal Naik

२०१६ साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या 'दंगल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अमीर खान, साक्षी तन्वर, फातिमा सना शेख हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने तब्बल २००० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. कुस्तीवर आधारित हा चित्रपट फोगाट कुटुंबावर बनला होता. मात्र यासाठी फोगाट कुटुंबाला किती पैसे मिळाले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? फोगाट कुटुंबातील बबिता फोगाट हिने याबद्दल सांगितलं आहे.

कोणाच्याही आयुष्यावर आधारित चित्रपट बनवताना त्यांची परवानगी घेणं आणि त्यांना त्यासाठी योग्य ते मानधन देणं गरजेचं असतं. फोगाट कुटुंबावर आधारित या चित्रपटासाठी त्यांना १ कोटी इतकं मानधन देण्यात आलं होतं. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बबिताने ही गोष्ट सांगितली आहे. या चित्रपटासाठी आम्हाला १ कोटी रुपये मिळाले असं ती म्हणाली. त्यावर मुलाखतकाराने तिला ही किंमत कमी आहे याचं तुम्हाला वाईट वाटतं का असा प्रश्न विचारला. त्यावर बबिताने नाही म्हटलं. बबिता म्हणाली, 'माझे बाबा म्हणजेच महावीर फोगाट यांनी सांगितलंय की पैशांपेक्षा लोकांचं प्रेम आणि आदर मिळाला पाहिजे. तो जास्त महत्वाचा आहे.'

२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या दंगल या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं होतं. अभिनेता आमिर खानने बबिताचे वडील महावीर फोगाट यांची भूमिका साकारली होती. तसेच आमिर या चित्रपटाचा सहनिर्मितासुद्धा होता. या चित्रपटात महावीर हे आपल्या मुलींना गीता आणि बबिता यांना ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यासाठी कसं प्रशिक्षण देतो ही गोष्ट दाखवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT