सूत्रसंचालनाच्या परीक्षेत रितेश पास की नापास?  esakal
Premier

Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना आवडलं का? वाचा जनतेचा कौल, आधी नावं ठेवली, आता...

Riteish Deshmukh Hosting For Bigg Boss Marathi: लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख सध्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतोय. त्याचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना आवडलंय का?

Payal Naik

Bigg Boss Marathi 5 Host: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन नुकताच सुरू झाला आहे. या सीझनमध्ये नवीन गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मात्र या सीझनमध्ये झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे कार्यक्रमाचा बदललेला होस्ट. यापूर्वी अभिनेते महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचं होस्टिंग करत होते. मात्र आता रितेश त्यांच्याजागी सूत्रसंचालन करताना दिसतोय. याबद्दल जेव्हा वाहिनीने पहिला प्रोमो प्रदर्शित केला होता तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. रितेशच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. मात्र आता बिग बॉसच्या घराचा पहिला भाऊचा धक्का सुरू झालाय. त्यात पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असं दिसतंय. रितेश जनतेच्या परीक्षेत पास झालाय असं म्हणायला हरकत नाही.

महेश यांच्याप्रमाणे तटस्थ राहून घरातल्यांना ओरडणं रितेशला जमणार आहे का, तो या जागेसाठी योग्य आहे का, त्याची होस्टिंगची स्टाइल कशी आहे, असे अनेक प्रश्न यापूर्वी विचारले गेले. आता पहिल्याच दिवशी भाऊच्या धक्क्यावर रितेशचं सूत्रसंचालन पाहून प्रेक्षकही त्याचे फॅन झाले आहेत. रितेशने ज्या प्रकारे चुकीला चूक म्हटलं, घरातल्यांना आरसा दाखवला, स्पर्धकांचे कान धरले आणि चांगल्या गोष्टींचं कौतुकही केलं ते पाहून चाहतेही त्याचं कौतुक करत आहेत. रितेशने निक्की, वैभव, जान्हवी पंढरीनाथ यांना त्याच्या स्टाईलने समजावलं. जे पाहून चाहते कमेंटमध्ये त्याचं कौतुक करत आहेत.

riteish deshmukh

एका नेटकऱ्याने त्याचं कौतुक करत लिहिलं, 'हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून आणि गरजेचं पण होतं, अगदी योग्य वागलात रितेश भाऊ.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'वाह खूप छान रितेश दादा, निकीला भाऊचा धक्का बसणं गरजेचं होतं. एकदम दर्जा.' आणखी एकाने लिहिलं, 'वाह दादा वाह, मला हेच बघायचं होतं.' एका नेटकऱ्याने लिहिलं, 'रितेश सर खूप खूप सुखद असं मनाला टच करणारे तुमचे शब्द होते. खूप छान वाटलं.'

दुसऱ्याने लिहिलं, 'मला रितेशचं होस्टिंग आवडलंय. कमाल.' आणखी एकाने लिहिलं, 'मी रितेश देशमुखचं दुसरं रूप बघतोय आज जे याआधी कधीच पाहिलं नव्हतं. एक नं. आता वाटतंय की तो खरंच या कार्यक्रमाचा होस्ट असण्याच्या योग्य आहे.' अशा अनेक प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. एकूणच रितेश आता होस्टिंगमध्येही प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dnyaneshwari Munde: परळीच्या बंगल्यावरुन कॉल आला अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप! 18 महिन्यात 8 तपास अधिकारी बदलले, आरोपी मोकाट

Latest Marathi News Updates : घनसावंगीमध्ये महिन्याभरानंतर जोरदार पाऊस

संतापजनक! सात वर्षीय चिमुरडीवर रिक्षा चालकाने केला बलात्कार; आरोपी तन्वीरला मियाँ दर्ग्याजवळून अटक, ती जोरजोरात ओरडू लागली अन्..

Ichalkaranji Gang War : एका हातात हत्यारे, दुसऱ्या हातात फटाके वजीर गँगची दहशत; महिलेवर जीवघेणा हल्ला, इचलकरंजीचा झालाय बिहार

ICC Meeting: द्विस्तरीय कसोटी क्रिकेटवर चर्चा अपेक्षित; आयसीसीची आजपासून विशेष सर्वसाधारण सभा

SCROLL FOR NEXT