ridhima pandit  sakal
Premier

Shubman Gill: क्रिकेटर शुभमन गिल रिद्धिमा पंडितसोबत गुपचूप बांधणार लग्नगाठ? लग्नाच्या अफवांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

Ridhima Pandit Shubman Gill: सध्या अभिनेत्री रिद्धिमा पंडित तिच्या आणि शुभमन गिलच्या लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत आहे.

Payal Naik

Ridhima Pandit Wedding Rumours: सध्या सोशल मीडियावर एक मोठी अफवा सुरू आहे. अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि क्रिकेटपटू शुभमन गिल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या जोरदार चर्चा आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. मात्र त्यांना आपलं लग्न मीडियापासून दूर ठेवायचं आहे , त्यामुळे ते गुपचूप लग्न करणार आहेत अशा अफवा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या सगळ्या बातम्यांवर अभिनेत्रीने स्वतः पूर्णविराम लावला आहे. तिने एका मुलाखतीत याबद्दल उत्तर दिलं आहे. सोबतच एक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचा समज दूर केलाय.

ridhima pandit

रिद्धिमाने नुकतीच फिल्मीग्यानला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, 'पहिली गोष्ट मी त्याला ओळखत नाही. तो चांगला क्रिकेटर आहे हेच मला ठाऊक आहे. मी जेव्हा कधी त्याला भेटेन तेव्हा नक्कीच या गोष्टीवर आम्ही दोघेही हसू. तो खूप गोड आहे असं मला वाटतं पण खरंच असं काहीही नाहीये. आम्ही एकमेकांना डेट करत नाही आहोत. रिद्धिमाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं की, 'या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. जर मी लग्नाचा विचार करत असेन तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. मी ते कधीही लपवणार नाही. मला नेहमी योग्य कारणांमुळे चर्चेत राहायचे आहे आणि माझ्या चाहत्यांना हे चांगलंच माहीत आहे.'

यासोबतच रिद्धिमाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने म्हटलं,'माझ्या लग्नाबद्दल पत्रकारांच्या अनेक कॉल्सनेच मला जाग आली, पण कसलं लग्न? माझं लग्न होत नाहीये. मी लग्न करत नाहीये आणि माझ्या आयुष्यात असं काही महत्त्वाचे घडत असेल तर मी स्वतः पुढे येऊन या बातमीबद्दल सांगेन, पण या बातमीत तथ्य नाही. या अफवा आहेत.' रिद्धिमा ही 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून घराघरात पोहोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT