isha deol  esakal
Premier

तुझ्या दोन आई आहेत ना? मित्राच्या प्रश्नानंतर अशी झालेली इशा देओलची अवस्था; घरी येताच हेमा यांना म्हणाली-

Esha Deol Talking About Dharmendra And Hema Malini Marriage: हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओल हिने तिच्या बालपणी घडलेली एक गोष्ट सांगितली आहे. जेव्हा तिच्या मित्रांनी तिला नको तो प्रश्न विचारला होता

Payal Naik

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. परंतु, तेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपला धर्म बदलून दुसरा विवाह केला. त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या. इशा आणि आहना. परंतु, त्यांची मोठी मुलगी इशा हिला तिच्या वडिलांच्या पहिल्या लग्नाबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. चौथीमध्ये जाईपर्यंत तिला वडिलांच्या पहिल्या पत्नीबद्दल ठाऊक नव्हतं. शाळेत घडलेल्या एका गोष्टीमुळे घरातल्यांनी तिला ही गोष्ट सांगितली.

राज कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या हेमा मालिनी यांची बायोग्राफी 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात याबद्दल माहिती दिली आहे. या पुस्तकात लिहिलंय, इशाने सांगितलं की जेव्हा ती चौथ्या इयत्तेत होती तेव्हा तिच्या शाळेतल्या मित्राने तिला विचारलं की तुझ्या दोन आई आहेत ना? हो ना? ते ऐकून इशा भडकली होती. ती म्हणाली, 'काय फालतुगिरी आहे. माझी फक्त एकच आई आहे. पण जेव्हा ती घरी आली तेव्हा तिने आईला शाळेत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं तेव्हा तिला धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहीत पडलं.

ईशाने बायोग्राफीमध्ये सांगितलं की, 'मी घरी पोहोचताच माझ्या आईला सांगितलं की एक मित्र मला असा प्रश्न विचारत होता, तेव्हा मला वाटतं की माझ्या आईने मला खरं सांगण्याचा निर्णय घेतला होता. तुम्हीच कल्पना करा, आम्ही चौथीत होतो आणि आम्हाला कशाचीही माहिती नव्हती. आजकालची मुलं खूप हुशार आहेत. तिने सांगितलं की धर्मेंद्र यांचं आणखी एक कुटुंब आहे. तेव्हा मला कळलं की माझ्या आईने अशा व्यक्तीशी लग्न केलंय जो आधीच एका दुसऱ्या स्त्रीचा पती आहे. त्यांना मुलंही आहेत. पण मला त्याचं कधीही वाईट नाही वाटलं. याचं सगळं श्रेयं माझ्या आई- वडिलांना जातं. त्यांनी आम्हाला कधीही तसं वाटू नाही दिलं. ते यायचे आमच्यासोबत जेवायचे आणि निघून जायचे. थांबायचे नाहीत. पण मला कधी त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागवत कांबळे रंगेहाथ अडकले

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT