Janhvi Kapoor  esakal
Premier

Janhvi Kapoor: 'मैदान'च्या प्रीमियरला जान्हवीची हजेरी, नेकलेसनं वेधलं साऱ्यांचे लक्ष, काय आहे खास?

Janhvi Kapoor: मैदान सिनेमाच्या प्रीमियरला जान्हवीने शिखराच्या नावाचा नेकलेस घालून हजेरी लावली.

priyanka kulkarni

Janhvi Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे ती तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे. जान्हवी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा नातू शिखर पहारियाला (Shikhar Pahariya) डेट करत असल्याच्या चर्चा गेला बराच काळ रंगल्या आहेत. जान्हवीनेही बऱ्याचदा हिंट्समधून ती शिखर डेट करत असल्याचं कबूलही केलं आहे. 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीजनमध्ये तिच्या तोंडून 'चुकून' आलेलं शिखरचं नाव असो किंवा त्यांचं सतत एकत्र दिसणं असो यामुळे जान्हवी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार की काय? अशाही चर्चा सध्या सगळीकडे सुरु झाल्या आहेत.

शिखर आणि तिच्या नात्याची चर्चा जोर धरत असतानाच जान्हवीच्या आणखी एका कृतीने लक्ष वेधून घेतलं. मैदान सिनेमाच्या प्रीमियरला जान्हवीने शिखराच्या नावाचा नेकलेस घालून हजेरी लावली. सोशल मीडियावर तिचा या लूकमधील फोटो व्हायरल होतोय. भाऊ अर्जुन आणि वडील बोनी यांच्यासोबत जान्हवीने प्रीमियरला हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या आईचा व्हाईट सूट घातला होता. पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते तिच्या गळ्यातील नेकलेसने. जान्हवीने गळ्यात 'शिखु' असे शब्द डायमंड्समध्ये बनवलेला नेकलेस घातला होता. जान्हवी शिखरला प्रेमाने शिखु म्हणते हे सगळ्यांनाच माहित असल्याने तिने तिच्या रिलेशनशिपची कबुली एकप्रकारे दिली असं मानलं जातंय. फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टावर शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

पाहा व्हिडीओ:

जान्हवी आणि शिखरने अजूनही स्वतःहून त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरीही त्यांना बऱ्याचदा मंदिरात एकत्र जाताना, एकत्र पार्ट्यांना हजेरी लावताना पाहिलं गेलंय. इतकंच नाही तर शिखरचे कपूर कुटूंबासोबतही चांगले संबंध आहेत. झूम चॅनेलला मुलाखत देताना जान्हवीचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी शिखरचं भरभरून कौतुक केलं होतं. "मला तो खूप आवडतो. मध्ये दोन वर्षं जान्हवीचा आणि त्याचा काही संपर्क नव्हता तरीही माझे आणि त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मला हे माहित होतं तो कधीच (तिला) सोडून जाणार नाही. तो आसपासच असेल. तो आमच्या सगळ्यांच्या म्हणजे फक्त जान्हवीचं नाही तर माझ्या आणि अर्जुनच्या सुद्धा जवळचा असून तो आता आमच्या कुटूंबाचा हिस्सा झाला आहे." बोनी यांच्या वक्तव्याने त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असलं तरीही अजून सगळेजण जान्हवी आणि शिखरच्या कबुलीची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT