Choreographer Jani Master’s National Award suspended by the I&B Ministry due to sexual assault allegations.  esakal
Premier

'स्त्री 2' मधील कोरिओग्राफरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रद्द, लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे आयबी मंत्रालयाचा निर्णय

Jani Master's National Film Award Suspended Over Sexual Assault Allegations : जानी मास्टरला लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याच्या काही दिवस आधीच ही कारवाई झाली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत त्यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे.

Sandip Kapde

नवी दिल्ली: माहिती व प्रसारण मंत्रालयाने (I&B) प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टर यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रद्द केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे हा निर्णय घेतला गेला आहे.

जानी मास्टरचे खरे नाव शेख जानी बाशा आहे, त्यांना ८ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "थिरुचित्रम्बलम" या तमिळ चित्रपटातील "मेघम करुक्काथा" गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, या आरोपांमुळे त्याचे दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले आहे.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे मोठी कारवाई

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कक्षाने ४ ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी केले. त्यात असे म्हटले आहे की, पीओसीएसओ (POCSO) कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे आणि प्रकरण अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने जानी मास्टर यांचा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. "या प्रकरणाच्या गंभीरतेच्या दृष्टीने आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, योग्य अधिकाऱ्यांनी २०२२ सालासाठी श्री. शेख जानी बाशा यांना दिलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या महिन्यात जानी मास्टरच्या माजी सहायकाने त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. या सहायकाने २०२० मध्ये मुंबईला कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासादरम्यान अत्याचार झाल्याचा दावा केला होता.

धमकावून हा प्रकार उघड न करण्याचे प्रयत्न चालू होते. सुरुवातीला याप्रकरणी नार्सिंगी पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यात बलात्कार, मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या कलमांखाली केस दाखल करण्यात आली.

न्यायालयीन प्रक्रिया आणि अटक

या प्रकरणात अधिक चौकशी केल्यानंतर असे उघड झाले की, पीडिता त्या घटनेच्या वेळी अल्पवयीन होती, त्यामुळे पीओसीएसओ कायद्याचे कलमही या प्रकरणात जोडण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी सायबराबाद पोलिसांनी जानी मास्टरला गोव्यामधून अटक केली आणि त्याला हैदराबाद येथे आणून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

पुढील आदेश येईपर्यंत पुरस्कार स्थगित

जानी मास्टरला लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याच्या काही दिवस आधीच ही कारवाई झाली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत त्यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT