jasmin bhasin  sakal
Premier

Actress Lost Eyesite: एक चूक महागात पडली! लोकप्रिय अभिनेत्रीच्या कॉर्नियाला दुखापत; डोळ्यांनी दिसणंच झालं बंद

Jasmin Bhasin: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन हिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ती चूक अभिनेत्रीला चांगलीच महागात पडली आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन हिच्याशी संबंधित मोठी बातमी आता समोर येते आहे. एका इव्हेंटसाठी केलेली एक गोष्ट अभिनेत्रीला चांगलीच महागात पडली आहे. जास्मिनचा डोळ्यांवर पट्टी बांधलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिच्या डोळ्यातील कॉर्नियाला दुखापत झाली असून तिला दिसणंही बंद झालं आहे. सध्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले आहेत मात्र तिला झोपण्यासाठीही अडचण येते आहे. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आहे. असं अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलंय?

जास्मिनने इटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की तिने १७ जुलै रोजी एक इव्हेंट केला होता. त्या कार्यक्रमासाठी ती दिल्लीला गेली होती. या कार्यक्रमासाठी तिने डोळ्यात लेन्स घातल्या होत्या. पण त्यानंतर तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. डोळे जळजळू लागले. तिला खूप त्रास होऊ लागला. त्यानंतर तिने चष्मा घालून आपलं काम पूर्ण केलं. तो संपूर्ण कार्यक्रम तिने पार पाडला. मात्र जेव्हा हे दुखणं वाढलं आणि असह्य झालं तेव्हा ती ताबडतोब डॉक्टरकडे गेली.

डॉक्टरकडे गेल्यानंतर तिला माहीत पडलं की तिच्या डोळ्यांच्या कॉर्नियाला दुखापत झाली आहे. त्यानंतर ती मुंबईत आली आणि उपचार सुरू केले. सध्या तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे मात्र अजूनही डोळ्यांना म्हणावा तसा आराम मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या ४- ५ दिवसात तिचे डोळे पूर्वीसारखे होतील मात्र त्यासाठी तिला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. जास्मिन यापूर्वी 'टशन-ए-इश्क' और 'दिल से दिल तक' या टीव्ही शोमध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT