jitendra joshi  esakal
Premier

देव आहे का? जितेंद्र जोशीच्या सहा वर्षाच्या लेकीने विचारलेला प्रश्न; अभिनेत्याने दिलं सुंदर उत्तर, म्हणाला-

Jitendra Joshi Talked About God: लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने त्याच्या देवाबद्दलची भावना व्यक्त केल्या आहेत. सोबतच त्याने मुलीला याचं काय उत्तर दिलं हेदेखील सांगितलं आहे.

Payal Naik

छोटा पडदा असो किंवा मोठा आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका गाजवणारा लोकप्रिय मराठी अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. प्रेसख्खंच्या लाडक्या जितूने सगळ्यांच्या मनात घर केलं. त्याच्या अभिनयासोबतच त्याचं वाचन आणि त्याची कविता लिहिण्याची आवड प्रेक्षकांना भावते. चाहते त्याच्या लिखाणाची आतुरतेने वाट पाहत असतात. जितेंद्र हा आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेला असतो. जितेंद्र हा स्वामी भक्त आहे. नुकतीच त्याने अभिनेता श्रेयस तळपदे याच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यात श्रेयसने त्याला तुझा देवावर विश्वास आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर जितूने त्याच्या आणि लेकीमध्ये झालेला संवाद सांगितला.

तुझा देवावर विश्वास आहे का या श्रेयसच्या प्रश्नावर उत्तर देताना जितेंद्र म्हणाला, 'जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाडे काहीतरी काम करत होता आणि तू मला त्याच्याकडे घेऊन गेलास आणि म्हणालास चल आपण सतीशला असिस्ट करू. काहीही काम नसायचं तरी सतीश रोज बोलवायचा. मी रोज पार्ल्याला जायचो दादरवरून. आणि तो मला त्याच्या घरी जेवू घालायचा. हे ऋणानुबंध का जुळतात? हीच माणसं का? जेव्हा तुला आईने सांगितलं नोकरी कर तेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते तेवढे सोड पण आपण दारूच्या गुत्त्यात का नाही गेलो बरोबर स्वामींच्या मठात का गेलो? ही सद्बुद्धी कुठून आली?'

पुढे जितेंद्र म्हणाला, 'रेवाने मला फार सुंदर गोष्ट विचारली. ती फक्त ६ वर्षांची होती. मला विचारलं बाबा, देव आहे का? मी म्हणालो आहे की बेटा. म्हणाली, कुठे आहे देव? मी म्हणालो, तुझ्या डोळ्यात आहे देव. म्हणाली, असा कसा डोळ्यात देव आहे? म्हटलं, तुझे डोळे काहीतरी बघू शकतात. कितीतरी गोष्टी आहेत ज्या बघू नाही शकत. ती म्हणाली, म्हणजे? मी म्हणालो, हे फ्रिजचं मॅग्नेट बघू शकतं का तुला? कारण ते निर्जीव आहे. तू बघू शकतेस कारण तुझ्यात देव आहे. ती म्हणाली आणखी कशाकशात देव आहे?'

'मी चपात्या बनवत होतो आणि ती किचनच्या ओट्यावर बसली होती. मी म्हणालो या चपातीमध्ये देव आहे. हा देव तुझ्या पोटात जातो तुला जिवंत ठेवतो. ती म्हणाली, पण ही खाल्ल्यावर त्याची शी होते. मग त्यात कसा देव आहे. मी म्हणालो, जे गटारात कीटक आहेत त्यांच्यासाठी ते अन्न आहे. त्यामुळे तो देव आहेच ना. ती म्हणाली हा बाबा. आहे रे देव आहे. खरंच आहे.' श्रेयस आणि जितेंद्र यांची मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: तुकाराम मुंढेचा कारवाईचा धडाका! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त, १५ हून अधिक उत्पादनांवर बंदी

Gold and Silver Rate: २० दिवसांत सोन्याची घसरण चांदी तब्बल १२,२५६ ने स्वस्त… काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?

अर्थमंत्री रुपयावर बोलेनात, राजनाथ देशाऐवजी धर्मेंद्रच्या संरक्षणाला, तर खड्डामंत्री...; ठाकरेंचा मोदींच्या मंत्र्यांना टोमणा

Ujani Dam: उजनी धरणाकडे ७४ हजार क्युसेक पाण्याची आवक; साठा ७४ टक्क्यांवर, शेतकऱ्यांना दिलासा

Latest Marathi News Update : दीपके कुटुंबाशी नातेसंबंध; शिंदेंच्या मंत्र्याने घेतली अभिजीतच्या आई-वडिलांची भेट

SCROLL FOR NEXT