john cena sakal
Premier

John Cena: अंबानींच्या लग्नाहून परतताच जॉन सीनाची शाहरुख खानसाठी खास पोस्ट; फोटो शेअर करत म्हणतो- त्याला भेटून...

John Cena Post For Shah Rukh Khan: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी अभिनेता जॉन सीना याने खास पोस्ट केली आहे.

Payal Naik

अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या लग्नासाठी संपूर्ण तारांगण अवतरलं होतं. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज कलाकार या लग्नाला हजर होते. या लग्नासाठी हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर जॉन सीना देखील उपस्थित होता. त्याने विशेष भारतीय कपड्यांमध्ये या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. या लग्नासाठी त्याने खास निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. मुकेश अंबानी यांचं अभिनंदन करताना तो चक्क हिंदीमध्येही बोलताना दिसला होता. नेटकऱ्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता मायदेशी परतताच त्याने एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता शाहरुख खान याचं कौतुक केलं आहे.

भारतात युन शाहरुखला भेटताच किंग खान देखील त्याचा जबरा फॅन झाला असल्याचं दिसतंय. लग्नाहून परत जाताच जॉनने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने किंग खानचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, 'मागचे २४ तास खूप छान होते. अंबानी कुटुंबाचं प्रेम आणि अप्रतिम पाहुणचार यासाठी मी त्यांचा आभारी आहे. हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. यसोहळ्यादरम्यान मला अनेक मित्रांना भेटायची संधी मिळाली. त्यातच मी शाहरुख खान यांना भेटू शकलो हेदेखील आहे आणि मी त्यांना भेटून माझ्या आयुष्यावर त्यांचा किती सकारात्मक प्रभाव आहे हे सांगू शकलो याचा मला जास्त आनंद आहे.'

अनंत आणि राधिका यांच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमातदेखील जॉन सीना आणि शाहरुख खान हजर होते. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या मिरवणुकीत देखील जॉन सीना बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत जबरदस्त डान्स करताना दिसला. अनंत अंबानी, अनिल कपूर आणि रणवीर सिंगसोबत त्याने माय नेम इज लखन या गाण्यावर डान्सही केला. आता त्याने केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT