Jolly LLB 3 Arshad Warsi to begin Shoot Latest Entertainment Marathi News Update  
Premier

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Jolly LLB 3 : आता जॉली एलएलबी थ्री हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सकाळ ऑनलाईन टीम

काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेली जॉली एलएलबी ही चित्रपट मालिका खूप गाजली होती. जॉली एलएलबी च्या पहिल्या भागात अभिनेता अर्शद वारसीने काम केलं होतं तर दुसऱ्या भागात अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. हे दोन्ही सिनेमे खूप गाजले आणि आता जॉली एलएलबी थ्री हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पुन्हा एकदा अर्शद वारसी या सिरीज मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणा आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या बातमीनुसार सिनेमाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हर्षद वारसी या सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानला रवाना होणार आहे. सिनेमाचं पूर्ण शूटिंग राजस्थानमध्ये पार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता यावेळी सिनेमाचं कथानक नेमकं कसं असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनचं काम लगेच सुरू होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

जॉली एलएलबी 3 चं सुभाष कपूर करणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी कोर्टात जॉली विरुद्ध जॉली अशी लढाई रंगणार आहे. त्यामुळे अक्षय कुमारही दुसऱ्या जॉलीच्या भूमिकेत दिसणार का याची चर्चाही सगळीकडे रंगली आहे. तर पहिल्या दोन्ही सिनेमांमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते सौरभ शुक्ला या सिनेमातही त्यांची ही गाजलेली भूमिका साकारणार आहेत.

जॉली एलएलबीचा पहिला भाग ज्यात अर्शद मुख्य भूमिकेत होता तो उत्तम गाजला होता तर अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या दुसऱ्या भागालाही उत्तम व्यावसायिक यश मिळालं होतं. टीकाकारांनी सुद्धा या सिनेमाचं कौतुक केलं होतं. तर सिनेमाचा स्क्रीनप्ले आणि कथानकाची मांडणी सगळ्यांना आवडली होती.

अक्षय कुमारची केप ऑफ गुड फिल्म्स ही संस्था या सिनेमाची निर्मिती करणार असून डिझ्ने या सिनेमाची सहनिर्मिती करणार आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय अक्षय आणि अर्शद वेलकम टू द जंगल या सिनेमातही एकत्र काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT