Juhi Chawla sakal
Premier

Juhi Chawla: सासूबाईंनी ऐनवेळी कॅन्सल केलेलं जुही चावलाचं आलिशान लग्न; २ हजार पाहुण्यांना केलेला फोन, अभिनेत्री ठरलेली कारण

Juhi Chawla Talked About Her Mother In Law: लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला हिने मुलाखतीत तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे.

Payal Naik

Juhi Chawla Wedding: अभिनेत्री जुही चावला हिने कायमच आपलं वैयक्तिक आयुष्य गुलदस्त्यात ठेवलं. मात्र तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चर्चा झाली. जुहीने तिच्या कुटुंबातील सगळ्यांच्या मृत्यूचं दुःख सहन केलं. तिने २९ वर्षांपूर्वी बिजनेसमन जय मेहता यांच्याशी लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नामुळे तिच्यावर कायम टीका होत आली असली तरी जय यांनी तिच्या पडत्या काळात तिला सांभाळलं. नैराश्यात गेलेल्या जुहीला त्यांनी पुन्हा जगण्याचं बळ दिलं. त्यांना दोन मुलंही आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे. तिच्या सासूबाईंनी अचानकच त्यांचं आलिशान लग्न कॅन्सल केलं होतं.

जुहीच्या सासूबाईंनी तिच्या लग्नात त्यांचं ठरलेलं महागडं लग्न रद्द करून घरच्याघरी लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तब्बल २ हजार लोकांना फोन करत लग्नाला न येण्याबद्दल सांगितलं होतं. हे सगळं त्यांनी फक्त जुहीसाठी केलं होतं. जुहीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना जुही म्हणाली, 'मी माझ्या करिअरच्या काही मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत होती आणि माझं लग्न होणार होतं. माझ्या आईचं वर्षभरापूर्वी निधन झालं होतं. जेव्हा लग्नाची तारीख जवळ येत होती तेव्हा मी विचार करत होती की माझी आई तर गेली जी माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करायची. आता माझं करिअरदेखील जाणार. मी खूप दुःखात होते.'

जुही पुढे म्हणाली, 'मला कळत नव्हतं मी कशी आनंदात राहू? एके दिवशी मला असह्य झालं आणि रडू लागले. मी माझ्या सासूबाईंना सांगितलं आणि त्या म्हणाल्या, ठीक आहे. त्यांनी सगळ्या कुटुंबाला लग्न मोठ्या प्रमाणात न करण्यासाठी समजावलं. आणि मी घरातल्या काही कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. माझ्या लग्नाला फक्त ८० ते ९० लोक उपस्थित होते. विचार करा की तुमच्या सासूबाईंनी आधीच पाठवलेली सगळी निमंत्रणं रद्द केली. त्यांनी जवळपास २ हजार लोकांना फोन करून लग्नाला न येण्याबद्दल सांगितलं.' जुही आणि जय यांची भेट निर्माते राकेश रोशन यांच्यामुळे झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

Pune: रेंजहिल्स परिसरात ज्येष्ठ महिलेचा एकाकी अंत; परदेशात स्थायिक मुलाकडून पाचव्या दिवशी अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT