Juna Furniture esakal
Premier

Juna Furniture Trailer Out: जुनं फर्निचर: वडील-मुलाच्या खटल्याची गोष्ट, मनाचा ठाव घेणारा ट्रेलर

Juna Furniture Trailer Out: वृद्ध आई- वडील आणि दुरावलेला मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणारा जुनं फर्निचर या चित्रपटाचा हा ट्रेलर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

priyanka kulkarni

Juna Furniture Trailer Out: महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांची मुख्य भूमिका असलेल्या जुनं फर्निचर (Juna Furniture) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. वृद्ध आई- वडील आणि दुरावलेला मुलगा यांच्या नात्यावर भाष्य करणारा हा ट्रेलर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

गोविंद पाठक हे वृद्ध गृहस्थ त्यांच्या मुलाने त्यांच्या पत्नीचा खून केलाय अशी तक्रार घेऊन पोलिस स्टेशनला येतात आणि परदेशात राहणाऱ्या त्यांच्या मुलाविरुद्ध केस उभी राहते. पत्नीच्या मृत्यूला गोविंद त्यांच्या मुलाला आणि सुनेला जबाबदार धरतात. मुलगा आणि वडिलांच्या या कोर्टातील लढाईवर हा सिनेमा आधारित आहे. आई-वडील मुलांप्रती असलेल्या कर्तव्यात कधीच कमतरता ठेवत नाहीत पण तीच मुले आई-वडील म्हातारे झाल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात? त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर का पडतो? हा प्रश्न सिनेमातून विचारला आहे.

ही आहे सिनेमाची कास्ट

महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, गिरीश ओक, सचिन खेडेकर, समीर धर्माधिकारी, शरद पोंक्षे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे.

दिमाखात पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. सिनेमाच्या संपूर्ण कास्ट आणि टीमने ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. गीतकार वैभव जोशी यांच्या 'सोबतीचा करार' या मैफिलीचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. केतकी माटेगावकर, स्वप्नील बांदोडकर आणि पवनदीप राज या गायकांनी सुद्धा हजेरी लावत गाणी सादर केली. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'काय चुकले सांग ना?' या गाण्याच्या काही ओळी सादर केल्या.

पाहा व्हिडीओ

२६ एप्रिल २०२४ ला हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित होणार असून सत्य-सई फिल्म्स आणि स्कायलिंकची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती यतीन जाधव यांनी केली आहे.या आधी महेश मांजरेकर यांचे पांघरूण, ही अनोखी गाठ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यांचे हे सिनेमे सगळ्यांनाच खूप पसंत पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT