Kalki 2898 AD esakal
Premier

Kalki 2898 AD: "समय आ गया है ..."; प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' ची टीम प्रेक्षकांना देणार मोठं सरप्राइज

Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची टीम प्रेक्षकांना लवकरच मोठं सरप्राइज देणार आहे. याबाबत नुकतीच एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Kalki 2898 AD: नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात प्रभास (Prabhas), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटाची टीम प्रेक्षकांना लवकरच मोठं सरप्राइज देणार आहे. याबाबत नुकतीच एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

प्रेक्षकांना मिळणार सरप्राइज

'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नुकतीच एक खास फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन हे खास लूकमध्ये दिसत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा चेहरा पूर्णपणे बँडेजने झाकलेले दिसत आहेत. त्यांचे फक्त डोळे दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, 'तो कोण आहे? हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. 21 एप्रिल रोजी सायंकाळी 7:15 वा." अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर "समय आ गया है", असंही लिहिलेलं दिसत आहे. आता आज 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची टीम कोणतं सरप्राइज देणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 9 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रभासचे आगामी चित्रपट

'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या व्यतिरिक्त प्रभासचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तो 'द राजा साब' या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे. तसेच प्रभास हा 'कनप्पा' या चित्रपटात कॅमिओ देखील करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT