Premier

Kalki 2898 AD : रिलीज आधीच प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की' घालतोय धुमाकूळ; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून किती गल्ला जमावला?

Kalki movie advanced booking : प्रभास, दीपिकाचा आगामी सिनेमा 'कल्की 2898 AD' सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच उत्तर अमेरिकेत भरघोस कमाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kalki movie collection : प्रभास (Prabhas) आणि दीपिकाच्या (Deepika Padukone) 'कल्की 2898 AD' (Kalki 2898 AD) सिनेमाची चर्चा सगळीकडे खूप आहे. नाग अश्विन यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा येत्या गुरुवारी रिलीज होतोय. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाची अॅड्वान्स बुकिंग जोरदार सुरु झाली असून उत्तर अमेरिकेत या सिनेमाची जोरदार बुकिंग झाल्याचं सिनेमाच्या वितरकांनी सांगितलं. उत्तर अमेरिकते ७७ हजार तिकिटांची विक्री झाली असून आतापर्यंत अॅड्वान्स बुकिंगमधून २.६ मिलियन डॉलरची कमाई या सिनेमाने केली आहे.

पार्थीअंगारा सिनेमा (Parthyangira Cinemas) हे वितरक या सिनेमाचं वितरण उत्तर अमेरिकेत करत असून त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केलं कि,"कल्की सिनेमाची उत्तर अमेरिकेत ७७,७७७ तिकिटांची विक्री केली असून प्रभास येत्या तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असून प्रेक्षकही त्यांच्या या लाडक्या कलाकाराला बघायला सिनेमागृहात येणार आहेत. "

सिनेमाचा ट्रेलर

कल्की सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे कि, सृष्टीचा विनाश होत असून नवीन जीव जन्म घेत नाहीये तेव्हाच एक गर्भवती स्त्री येते आणि सगळ्यांमध्ये आता सृष्टीचा विनाश होणार नाही याची आशा निर्माण होते. महाभारत ते कलियुग असा कालखंड या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.

कल्की 2898 एडी या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. चित्रपटाची कथा देखील नाग अश्विन यांनीच लिहिली आहे, या सिनेमाची कथा त्यांनी 2019 मध्ये लिहायला सुरुवात केली होती.

अश्विन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून त्याला अनेकदा हा सन्मान देण्यात आला आहे. आता अशा दिग्दर्शकाने इतकी वर्षे कथेवर काम केले आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहे. २७ जून २०२४ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या आधी हा सिनेमा मे मध्ये रिलीज होणार होता पण काही अपरिहार्य कारणामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सीईटी परीक्षेत अपयशाने विद्यार्थिनीने संपवलं जीवन, पुण्यातील लोहगाव परिसरातील धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : जीएसटी अनुदानात मोठी वाढ; नागपूर महापालिकेच्या तिजोरीला दिलासा

Cow National Animal Demand : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा... सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने सुरू केली मोहीम

Nagpur News: नागपुरात आज ‘इमॉर्टल आशा’ची सुरेल मैफल; रसिक अनुभवणार आशाताईंच्या गीतांचा सुवर्णकाळ

एकच झलक, सबसे अलग! चक्क 8000mAh बॅटरीसह Realme 16T 5G लाँच, दमदार फीचर्स अन् परवडणारी किंमत पाहा

SCROLL FOR NEXT