Kalki 2898 AD esakal
Premier

Kalki 2898 AD: प्रतीक्षा संपली! प्रभासच्या 'कल्की' ची रिलीज डेट जाहीर; नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

Kalki 2898 AD: नुकतंच कल्की सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज केलं. या पोस्टरवर प्रभास, दीपिका आणि अमिताभ यांच्या सिनेमातील पात्रांची झलक पाहायला मिळतेय.

priyanka kulkarni

Kalki 2898 AD: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती प्रभासचा (Prabhas) आगामी सिनेमा कल्की 2898 एडी (Kalki 2898 AD) ची. कलियुग आणि कल्की अवतार यावर बेतलेला हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण आता या सिनेमाची रिलीज डेट निर्मात्यांनी पुढे ढकलली असून आता हा सिनेमा 9 मे ऐवजी जूनमध्ये रिलीज होणार आहे.

नुकतंच कल्की सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज केलं. या पोस्टरवर प्रभास, दीपिका आणि अमिताभ यांच्या सिनेमातील पात्रांची झलक पाहायला मिळतेय. आणि या पोस्टरला हा सिनेमा 27 जून ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असं कॅप्शन दिलंय. वाळवंट, युद्ध अस या पोस्टरवर दिसत असून सिनेमाचं पोस्टर सगळ्यांनाच पसंत पडलं आहे.

या सिनेमाची दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं असून ही एक साय फाय फिल्म आहे. गेल्या आठवड्यात या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टिझरमध्ये अमिताभ हे अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं रिव्हील करण्यात आलं. अश्वत्थामा शिवलिंगाची पूजा करत असताना अचानक त्यांना काही संकेत दिसतात आणि ते वेळ जवळ आलीये अस म्हणतात आणि स्वतःची अश्वत्थामा ही ओळख उघड करतात. असं दाखवण्यात आलंय.

तर प्रभास या सिनेमात भैरव ही भूमिका साकारत असून दीपिका पद्मा ही भूमिका साकारतेय तर कमल हसन कालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. विशेष करून या सिनेमात महाभारताच्या युद्धाच्या शेवटापासून ते 2898 सालापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे पण या सिनेमात जास्तीत जास्त भारतीय संस्कृती दिसेल असा प्रयत्न केल्याचं दिग्दर्शकांनी म्हंटलं आहे.

ही एक बिग बजेट साय फाय फिल्म असून तब्बल 600 करोडमध्ये हा सिनेमा बनवल्याचं सिनेमाच्या टीमने जाहीर केलं आहे. तेलुगू आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार असून काही सीन हिंदी व्हर्जनसाठी नव्याने शूट करण्यात आले आहेत. ए ए फिल्म्स आणि सी अस्वनी दत्त यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT