Kalki 2898 AD Esakal
Premier

Kalki 2898 AD : एका साऊथ कोरियन आर्टिस्टच्या आर्टवर्कमधून सीन चोरल्याचा आरोप ; कल्की 2898 AD सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

Netizens put allegations on Kalki 2898 AD : एका साऊथ कोरियन आर्टिस्टने कल्की सिनेमाच्या टीमवर त्याचं आर्टवर्क चोरल्याचे आरोप केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती नाग अश्विनच्या आगामी 'कल्की 2898 AD' या सिनेमाची. या सिनेमाच्या ट्रेलरने सगळ्यांची मनं जिंकली पण प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका साऊथ कोरियन आर्टिस्टने त्याचं आर्टवर्क या सिनेमात कॉपी केल्याचा आरोप लावला आहे. तसे पुरावेही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कल्की सिनेमावर चोरीचा आरोप

सुंग चोई नावाच्या साऊथ कोरियन आर्टिस्टने सोशल मीडियावर या सिनेमासंदर्भात पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमवर चोरीचा ठपका ठेवला आहे. त्याने आजवर नेटफ्लिक्स, डिझने हॉटस्टार , वॉर्नर ब्रोस, मार्वल स्टुडिओजसाठी अॅनिमेशनचं काम केलं आहे. सोशल मीडियावर त्याने स्क्रिनशॉट शेअर करत सिनेमाच्या टीमवर आरोप केले.

कल्की 2898 AD च्या ट्रेलरच्या सुरुवातीच्या सीनमध्ये दिसणारा बिल्डिंग कोसळण्याचा सीन या सिनेमाच्या टीमने त्याच्या आर्टवर्कमधून कॉपी केल्याचं म्हंटलं आहे. त्याने त्याच्या या आर्टवर्कच्या शेअर केलेल्या फोटोमधून दहा वर्षांपूर्वी त्याने हे बनवलं होतं हे दिसून येतंय आणि सिनेमातील त्या सीनमध्येही बऱ्यापैकी साधर्म्य दिसून येत आहे.

कन्सेप्ट डिझायनर आणि इल्युस्टेटर असलेल्या सुंगने सिनेमाची निर्मिती संस्था वैजयंती मुव्हीजवर त्याच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती वापरल्याचा आरोप केला आहे.

कलाकाराने केली टीका

हे आर्टवर्क बनवणाऱ्या सुंग चोई कलाकाराने सिनेमाच्या टीमवर टीका केली आहे. "परवानगीशिवाय कोणतीही कलाकृती वापरणे हा गुन्हा आहे. यामुळे आपण एखाद्या नियम नसलेल्या जगात काम करत आहोत का असा प्रश्न मला पडतो. " असं त्याने म्हणत सिनेमाच्या टीमला टॅग केलं पण काही वेळाने त्याने दिलेलं कॅप्शन डिलीट केलं.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करत सिनेमाच्या टीमवर टीका केली. "तू लवकरात लवकर कायदेशीर कारवाई कर" अशी प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी सिनेइंडस्ट्रीवर आरोप केले आहेत.

या संदर्भात सिनेमाची टीम काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. २७ जून २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार असून अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सीईटी परीक्षेत अपयशाने विद्यार्थिनीने संपवलं जीवन, पुण्यातील लोहगाव परिसरातील धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : जीएसटी अनुदानात मोठी वाढ; नागपूर महापालिकेच्या तिजोरीला दिलासा

Cow National Animal Demand : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा... सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने सुरू केली मोहीम

Nagpur News: नागपुरात आज ‘इमॉर्टल आशा’ची सुरेल मैफल; रसिक अनुभवणार आशाताईंच्या गीतांचा सुवर्णकाळ

एकच झलक, सबसे अलग! चक्क 8000mAh बॅटरीसह Realme 16T 5G लाँच, दमदार फीचर्स अन् परवडणारी किंमत पाहा

SCROLL FOR NEXT