Kamal Sadanah esakal
Premier

Bollywood News: दारु पिऊन वडिलांनी झाडल्या गोळ्या; 20 व्या वर्षी अभिनेत्यानं डोळ्यासमोर पाहिला संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू

Kamal Sadanah: कमल सदाना यांनी सांगितलं की, त्यांच्या 20 व्या वाढदिवसाला त्यांच्या वडिलांनी गोळ्या झाडून त्यांच्या बहिणीला आणि आईला मारलं, तसेच त्यांच्या वडिलांनी स्वत:ला देखील संपवलं.

priyanka kulkarni

Kamal Sadanah: बेखुदी, बाली उमर को सलाम आणि अंगारा यांसारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते कमल सदाना (Kamal Sadanah) यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा समाना केला. कमल यांनी वयाच्या 20 व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला आहे. या धक्कादायक घटनेबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

वडिलांनी गोळ्या झाडून बहिणीला आणि आईला मारलं

कमल सदाना यांनी सांगितलं की, त्यांच्या 20 व्या वाढदिवसाला त्यांच्या वडिलांनी गोळ्या झाडून त्यांच्या बहिणीला आणि आईला मारलं, तसेच त्यांच्या वडिलांनी स्वत:ला देखील संपवलं. या घटनेबद्दल ते म्हणाले, "माझ्या आयुष्यातील ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी मी माझ्या डोळ्यासमोर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू पाहिला."

पुढे ते म्हणाले, "गोळी लागल्यामुळे रक्तस्त्राव होत असलेल्या मी आई आणि बहिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी मला माहित नव्हते की मलाही गोळी लागली आहे. डॉक्टरांनी विचारले, तुझ्या शर्टावर इतके रक्त का लागले आहे?' यावर म्हणालो, हे रक्त माझ्या आईचे किंवा बहिणीचे असावे. त्यावर डॉक्टर म्हणाले, नाही, तुला देखील गोळी लागली आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये पुरेशी जागा नाही. तुला दुसऱ्या दवाखान्यात जावे लागेल."

"मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी माझी जखम बरी केली. डॉक्टरांनी मला भूल देखील दिली होती, त्यानंतर मला घरी नेण्यात आले आणि तिथे मी माझ्या आईचा, वडिलांचा आणि बहिणीचा मृतदेह पाहिला. ज्या घरात ही धक्कादायक घटना घडली, त्याच घरात मी आता राहतो. ", असंही कमल सदाना यांनी सांगितलं.

कमल सदाना यांचे चित्रपट

1992 मध्ये रिलीज झालेल्या बेखुदी या चित्रपटाच्या माध्यमातून कमल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या पिप्पा या चित्रपटात देखील कमल सदाना यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: हिंगोलीमध्ये पुन्हा बीडसारखी घटना! दोघांनी मिळून एकाला जनावरासारखं मारलं; व्हिडीओ व्हायरल

Nagpur District: सावनेर परिसरात एकाच दिवशी उष्माघाताचे दोन बळी; चार दिवसांत तिसरी घटना; वाढत्या तापमानाने चिंता वाढली, खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pune News: सीईटी परीक्षेत अपयशाने विद्यार्थिनीने संपवलं जीवन, पुण्यातील लोहगाव परिसरातील धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : जीएसटी अनुदानात मोठी वाढ; नागपूर महापालिकेच्या तिजोरीला दिलासा

Cow National Animal Demand : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा... सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनेने सुरू केली मोहीम

SCROLL FOR NEXT