Kangana Ranaut,Urmila Matondkar esakal
Premier

Kangana Ranaut: कंगना उर्मिला मातोंडकरला म्हणाली "सॉफ्ट पोर्न स्टार"; "त्या" व्हिडीओची होतीये चर्चा

Kangana Ranaut: कंगनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक लढत असलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सध्या चर्चेत आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत आणि कंगनामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कंगनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यानंतर कंगनानं त्या पोस्टला सडेतोड उत्तर दिलं. अशातच सुप्रिया श्रीनेत आणि कंगना यांच्या सोशल मीडियावरील वादादम्यान कंगनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल

कंगनाचा एक जुना व्हिडीओ दाऊद नदाफ यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना ही उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार'म्हणताना दिसत आहे. व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "जेव्हा कोणीतरी सुप्रिया श्रीनेट जी यांचे खाते हॅक केले आणि त्याद्वारे कंगना रानौतबद्दल काही बोलले गेले तेव्हा संपूर्ण गोदी मीडियाने गोंधळ सुरू केला. पण काही दिवसांपूर्वी याच कंगना रानौतनं काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं. यावर कंगना रानौतला माफी मागायला सांगितली होती?"

सुप्रिया यांच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आक्षेपार्ह पोस्ट

काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अकाऊंटवरुन कंगनाबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टवर कंगनाने निशाणा साधला होता.

"प्रिय सुप्रिया जी, एक कलाकार म्हणून मी 20 वर्षांपासून काम करत आहे. या काळात मी विविध महिलांची भूमिका निभावली आहे. क्वीनमध्ये एका साध्या मुलीपासून धाकडमध्ये एक आकर्षक जासूज, तसेच मणिकर्णिकामध्ये एक देवी ते चंद्रमुखी चित्रपटात एका राक्षसाची भूमिका देखील मी केली आहे", अशी पोस्ट शेअर करुन कंगनानं सुप्रिया श्रीनेत यांना सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या, "माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटचा एक्सेस अनेकांकडे आहे. यातील एका व्यक्तीने आज अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. मला याची माहिती मिळताच मी ती पोस्ट काढून टाकली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT