Kangana Ranaut  esskal
Premier

Kangana Ranaut: निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कंगनानं घेतली आलिशान कार; किंमत वाचून डोळे विस्फारतील

Kangana Ranaut: कंगनानं नुकतीच एक आलिशान गाडी घेतली आहे. कंगनाच्या या नव्या गाडीची किंमत जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. कंगना ही हिमाचल (Himachal) प्रदेशातील मंडी येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तिला भाजपचं तिकीट मिळालं आहे. कंगनाच्या राजकारणातील एन्ट्रीची बरीच चर्चा झाली. तिन मंडीमध्ये प्रचार करण्यास देखील सुरुवात केली आहे. अशातच आता राजकारणासोबतच कंगना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहेत. कंगनानं नुकतीच एक आलिशान गाडी घेतली आहे. कंगना तिच्या नव्या गाडीमध्ये स्पॉट झाली. कंगनाच्या या नव्या गाडीची किंमत जाणून घेऊयात...

नव्या कारसोबत स्पॉट झाली

कंगना रनौत मुंबईतील एका सलूनबाहेर स्पॉट झाली. सलूनमधून बाहेर पडल्यानंतर कंगना तिच्या नवीन मर्सिडीजमध्ये बसताना दिसली.

कंगनाच्या कारची किंमत

कंगनानं मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 4 मॅटिक खरेदी केली आहे. या कारमध्ये 3982-cc इंजिन आहे. या आलिशान कारची किंमत 2 कोटी 92 लाख रुपये आहे.

कंगनाकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन

रिपोर्टनुसार, कंगनाकडे BMW 7-सीरीज 730LD, एक मर्सिडीज GLE 350D SUV आणि ऑडी Q3 देखील आहे. मुंबईमध्ये घर आणि एक ऑफिस या दोन प्रॉपर्टीजची देखील कंगना मालकीण आहे.

काँग्रेसवर कंगनानं केली टीका

कंगना सध्या निवडणुकीचा प्रचार करत आहे. मंडीमधील सभेदरम्यान केलेल्या भाषणात कंगना म्हणाली, "मंडीतून मला उमेदवारी देण्यात आली हे काँग्रेसला खटकले. ते घाणेरडे राजकारण करू लागले.त्यांचे नेते राहुल गांधी हिंदूंमधील शक्ती नष्ट करण्याबद्दल बोलतात. त्यांच्या प्रवक्त्यांनी मंडीतील महिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: अमित शाह लोणीमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT