Giorgia Meloni And Narendra Modi sakal
Premier

Narendra Modi: जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदींच्या व्हिडीओवर कंगनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, "मोदीजींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते..."

Giorgia Meloni And Narendra Modi: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जॉर्जिया मेलोनी या "हॅलो फ्रॉम मेलोडी टीम", असं म्हणताना दिसत आहेत.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी शनिवारी (15 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा (Narendra Modi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॉर्जिया मेलोनी या "हॅलो फ्रॉम मेलोडी टीम", असं म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओवर आता कंगना रनौतनं (Kangana Ranaut) प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाची पोस्ट

कंगनानं पंतप्रधान मोदींचा आणि मेलोनी यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करुन पोस्टमध्ये लिहिलं, "मोदीजींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते महिलांना असे वाटू देतात की, ते त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे मोदीजी टीम मेलोनी आहेत, असे पंतप्रधान मेलोनी यांना वाटते, यात काही आश्चर्य नाही"

Narendra Modi,Giorgia Meloni

इटलीतील अपुलिया येथे झालेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांनी एक सेल्फी देखील काढला.शिखर संमेलनस्थळी पोहोचल्यावर मेलोनी यांनी नमस्ते करुन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या मेलोनी यांच्या निमंत्रणावरून 2024 च्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहिले. "भारताला G7 शिखर परिषदेचा भाग होण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद,", असं मोदींना ट्वीटमध्ये लिहिलं.

कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, दिवंगत सतीश कौशिक आणि महिमा चौधरी देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT