Raveena Tandon Esakal
Premier

Raveena Tandon : कंगनाने दिली रवीनाची साथ ; व्हायरल झालेल्या व्हिडिओवर म्हणाली "हे खूप धोकादायक..."

Raveena Tandon Case : रवीना टंडनवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने रवीनाच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai : मुंबईच्या रस्त्यावर रवीनावर झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतोय. सुरुवातील रवीनाने दारूच्या नशेत वृद्धेला मारहाण केल्याच्या आरोपवावरून तिला धक्काबुक्की केल्याचं म्हंटलं जात होतं. पण नुकतंच पोलिसांनी दिलेल्या बातमीनुसार, रवीनाने (Raveena Tandon) दारू प्यायली नव्हती आणि तिने कुणालाच मारहाण केली नाही हे स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री आणि सध्या राजकारणात सक्रिय झालेल्या कंगना रनौतने (Kangana Ranaut) रवीनाचं समर्थन केलं आणि तिच्याबाबत घडलेल्या घटनेबाबत खेद व्यक्त केला.

पोस्टमधून व्यक्त केला संताप

सोशल मीडियावर कंगनाने एक पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला. ती म्हणाली," रवीना टंडन जी यांच्यासोबत जे काही झालं ते खूप चिंताजनक आहे ; जर दुसऱ्या समाजातील अजून ५-६ लोकं असते तर त्याची मारून मारून हत्या केली असती आणि तिलाही हानी पोहोचवली असती. आम्ही अशा संतापजनक घटनेचा निषेध करतो आणि त्या संबंधित व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे. अशा हिंसक व्यवहार असलेल्या व्यक्तींना सोडलं नाही पाहिजे."

कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Kagana's Post

काय घडलं नेमकं?

सोशल मीडियावर रवीना आणि तिच्या ड्रायव्हरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रवीना लोकनाच्या गर्दीला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतेय तर एक पुरुष आणि एक स्त्री तिच्यावर मारहाणीचा आरोप करताना दिसत आहेत.

पण पोलिसांनी केलेल्या तपासानुसार तसं काहीही घडलं नसून ते कुटूंब खोटं बोलत असल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी सिसीटिव्ही फुटेज तपासलं असताना त्यांना ड्रायव्हरने कोणालाही मारहाण केली नसल्याचं दिसलं. तर रवीना आणि तिचा ड्रायव्हर अजिबात दारूच्या नशेत नव्हते हे पोलिसांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, दोन्ही ग्रुपमध्ये झालेल्या वादानंतर खार पोलीस स्टेशनला तक्रार दोघांकडून दाखल करण्यात आली. पण काही काळाने दोघांनीही अर्ज दाखल करून तक्रार मागे घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी मिड डे या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT