kangana ranaut  sakal
Premier

Kangna Ranaut: कंगना रणौतची खासदारकी अडचणीत; कोर्टात ती गोष्ट सिद्ध झाल्यास जाऊ शकते खुर्ची; काय आहे प्रकरण?

Kangana Ranaut Membership Of Parliament: कंगना रणौतच्या खासदारकीला आता कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. ते सिद्ध झालं तर कंगनाची खासदारकी रद्द होऊ शकते.

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने २०२४ मध्ये हिमाचल प्रदेश येथून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ती विजयी ठरली. सध्या कंगना मंडी येथील खासदार आहे. मात्र आता तिच्या या विजयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. तर हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टाने कंगनाला नोटीस पाठवली आहे. किन्नोर येथील एका व्यक्तीने त्यांचं निवडणुकीतील अर्ज चुकीच्या पद्धतीने अपात्र ठेवल्याचा आरोप केल्याने आता कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे.

किन्नोरयेथील लायक राम नेगी यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी दावा केला आहे की त्यांनी मंडी येथून निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या नावाचा अर्ज दिला होता. मात्र त्यांचा अर्ज चुकीच्या कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आला. त्यांना निवडणूक लढण्यापासून अडवण्यात आलं. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नेगी यांनी आरोप केला आहे की त्यांनी निवडणुकीच्या अर्जासोबत नो ड्यू सर्टिफिकेटदेखील दिलं होतं. मात्र मंडीच्या डेप्युटी कमिशनने त्यांच्याकडे वीज, पाणी आणि टेलिफोन विभागांकडून अतिरिक्त मंजुरीची मागणी केली. त्यांनी ही सगळी कागदपत्र देऊनही त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.

या प्रकरणी न्यायमूर्ती जोत्स्ना रेवाल यांनी कंगनाला याबद्दल तिचं उत्तर नोंदवण्यासाठी २१ ऑगस्ट पर्यंत वेळ दिला आहे. रंगी यांच्या मते जर त्यांनी ही निवडणूक लढवली असती तर ते जिंकले असते. मात्र त्यांना निवडणूक लढण्यापासून अडवण्यात आलं. यासगळ्या प्रकारामुळे आता कंगनाची खुर्ची अडचणीत आहे.

नियम काय सांगतो?

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार जर कोणत्याही चुकीच्या कारणामुळे कोणत्याही एखाद्या अर्जदाराचा अर्ज बाद केला जातो तेव्हा ती संपूर्ण निवडणूक रद्द ठरवण्यात येते. त्यामुळे जर नेगी यांनी केलेले आरोप खरे ठरले तर कंगनाची खासदारकी जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT