Kangana Ranaut Esakal
Premier

Kangana Ranaut Slapped : कुलविंदर अजून निलंबितच ; नोकरी परत मिळाल्याच्या बातम्यानंतर सीआयएसएफने दिलं स्पष्टीकरण

Kulwinder Kaur is still suspended : खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतला कानाखाली मारणाऱ्या कुलविंदर कौरला नोकरी परत मिळाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर सीआयएसएफने या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut Slapgate : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतला कानाखाली मारणाऱ्या कुलविंदर कौरला तिची नोकरी परत मिळाल्याची आणि बंगळुरूमध्ये तिची बदली झाल्याची बातमी चर्चेत होती. ही बातमी सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर सीआयएसएफने ट्विट करत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर , जिने भाजपाच्या खासदार कंगना रनौतच्या कानाखाली मारली होती ती अजून निलंबित असून तिची तिच्या विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे असं स्पष्टीकरण दिल आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केली आहे.

दरम्यान, कुलविंदरवर काय कारवाई केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

काय घडलं नेमकं ?

कंगना रनौतला कानाखाली मारणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची चंदीगडमधून बदली करण्यात आल्याचा दावा बुधवारी एका अहवालात करण्यात आला होता. तिची बदली होऊन बंगळुरूमध्ये ‘पुन्हा नियुक्त’ करण्यात आल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री-भाजप खासदारासोबत घडलेल्या घटनेनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे अशी बातमी सगळीकडे पसरली होती पण नंतर सीआयएफएसने या बाबतीत स्पष्टीकरण देत हे वृत्त नाकारलं आहे.

कुलविंदरने कंगनाने तिच्या आई आणि शेतकरी आंदोलकांविरोधात वक्तव्य केल्याने ही कृती केल्याची कबुली दिली होती. या घटनेनंतर अनेक शेतकरी संघटनांनी आणि काही कलाकारांनी कुलविंदरचं समर्थन केलं होतं. तसंच तिचे गावकरी आणि कुटूंबानेही तिला साथ दिली होतो. पोलिसांनी तिच्यावर एफआयआर दाखल केला होता तर सीआयएफएसनेही तिच्यावर कारवाई केली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही लोकांनी कंगनाचे समर्थन करत या घटनेचा निषेध नोंदवला होता तर कंगनानेही पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केलेल्या सोबतच तिच्या इमर्जन्सी या सिनेमाचं प्रोमोशनही केलं.

गायक विशाल ददलानीबरोबर अनेकांनी कुलविंदरच्या समर्थनार्थ धाव घेतली होती. विशाल ददलानी यांनी सीआयएसएफ जवानांच्या पदावरून हटल्यास त्याला नोकरी देऊ, अशी पोस्टही सोशल मीडियावर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT