Darshan sakal
Premier

Renuka Swamy: रेणुका स्वामी मर्डर मिस्ट्रीत नवा ट्वीस्ट; प्रसिद्ध अभिनेता दर्शनला अटक

रेणुका स्वामीच्या (Renuka Swamy) हत्येप्रकरणी दर्शनला अटक करण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Darshan: 'राऊडी ऑफ सँडलहूड' म्हणून ओळखला जाणारा कन्नड अभिनेता दर्शन (Darshan) याला मंगळवारी (11 जून) एका हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेणुका स्वामीच्या (Renuka Swamy) हत्येप्रकरणी दर्शनला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री पवित्रा गौडा हिला अक्षेपार्ह मेसेज पाठवण्याचा रेणुका स्वामीवर आरोप होता. आता रेणुका स्वामीच्या हत्येप्रकरणी म्हैसूर येथील फार्महाऊसमधून दर्शनला अटक करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील रहिवासी असलेल्या रेणुका स्वामीनं अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवले होते. पवित्रा गौडाचे दर्शनाचे अफेअर आहे, असे म्हटलं जात आहे. 8 जून रोजी रेणुकाची हत्या करण्यात आली होती आणि 9 जून रोजी तिचा मृतदेह सापडला होता. रेणुकानं आत्महत्या केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केला होता, मात्र तपासात तिची हत्या झाल्याचे उघड झाले.

रिपोर्टनुसार, तपासादरम्यान, दर्शनने दिलेल्या सूचनेनुसार रेणुकाची हत्या झाल्याचे पोलिसांना आढळून आले. राजराजेश्वरी नगरमधील दर्शनचा जवळचा सहकारी विनयच्या गॅरेजमध्ये दर्शनासमोर रेणुका मारल्या गेल्याचेही अनेक अहवालात म्हटले गेले आहे. त्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला.

दर्शनासह अन्य 10 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. द डेव्हिल या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी दर्शन हा म्हैसूरमध्ये होता.

जाणून घ्या दर्शनबाबत...

दर्शन हा ज्येष्ठ कन्नड अभिनेते थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. त्याने 2001 मध्ये मॅजेस्टिक या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कटेरा, गराडी, क्रांती, रॉबर्ट, इन्स्पेक्टर विक्रम, चक्रवर्ती, तारक, नागरहावू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT