CCTV footage shows the terrifying moment when gunmen opened fire outside comedian Kapil Sharma’s café in Canada.  esakal
Premier

Kapil Sharma Canada Cafe Shooting Video : कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर झालेल्या भयानक गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर!

Shooting on Kapil Sharma's cafe in Canada : हल्लेखोराने कारमधूनच दहा ते बारा राऊंड फायर केले अन् नंतर घटनास्थळावरून पसार झाला

Mayur Ratnaparkhe

Kapil Sharma Canada Cafe Shooting Viral Video : कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेमध्ये आज गोळीबार झाला. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच या कॅफेचं उद्घाटन झालं होतं. आता हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

 व्हिडिओमध्ये दिसते आहे की, हल्लेखोराने कारमधूनच पिस्तूल काढून १० ते १२ राउंड फायर केले. सुदैवाने, या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगने घेतली आहे.

घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित आहे, पोलिस या घटनेचा बारकाईने तपास करत आहेत. या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोर कारमधून आले होते आणि गोळीबार केल्यानंतर तेथून पळून गेले.

या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. हरजीत सिंग लड्डी हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहे आणि तो बीकेआय म्हणजे बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. प्राप्त माहितीनुसार  कपिल शर्माच्या काही जुन्या विधानामुळे हा हल्ला केला गेल्याचे लड्डीने म्हटले आहे.

कपिलचा कॅफे उघडून फक्त तीन दिवस झाले आहेत. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी सोशल मीडियावर कॅफेचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. कपिल शर्मा हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. अशा परिस्थितीत गोळीबारासारख्या खळबळजनक घटनेने परिसरातील सर्वांनाच हादरवून टाकले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Kolhapur Muncipal : मनपा निवडणूक आचारसंहिता लागू होताच कारवाई; कोल्हापुरात इच्छुकांचे फलक हटवले

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

SCROLL FOR NEXT