Kartam Bhugtam esakal
Premier

Shreyas Talpade: "क्या वाकई में…जो जैसा करता है…वैसा भरता है?"; श्रेयसच्या 'कर्तम भुगतम'चा टीझर रिलीज

Shreyas Talpade: 17 मे 2024 ला हा सिनेमा रिलीज होणार असून हा सिनेमा पाच भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

priyanka kulkarni

Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आता पुन्हा एकदा नव्या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कर्तम भुगतम (Kartam Bhugtam) असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावर सिनेमाचा हा टीझर गाजतोय.

कर्तम भुगतम चित्रपटाच्या टीझरमध्ये श्रेयस वेगेवगेळ्या देवस्थानांना भेटी देत असल्याचं पाहायला मिळत आहे तर विजय राज यांचा साऊथ इंडियन लूक दिसत असून "जे काही घडायचं आहे ते घडणारच आहे" असे संवाद त्यांच्या तोंडी आहेत. सिनेमाच्या टीझरवरून माणसांची कर्म, ज्योतिष आणि भविष्य यावर भाष्य करणारा हा सिनेमा असावा असं वाटतंय. श्रेयस तळपदे, विजय राज, अक्सा परदासनी आणि मधू यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. काल आणि लक या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक सोहम पी शाह यांनी या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. "जे काही निघून जातं तेच परत येतं" असं कॅप्शन या टीझरला देण्यात आलं आहे.

पाहा टीझर:

कधी रिलीज होणार चित्रपट?

17 मे 2024 ला हा सिनेमा रिलीज होणार असून हा सिनेमा पाच भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. गंधार फिल्म्स अँड स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. बऱ्याच काळाने श्रेयस एका वेगळ्या सिनेमातून आणि भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

काही महिन्यांपूर्वीच श्रेयसचा 'ही अनोखी गाठ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात त्याने अभिनेत्री गौरी इंगवलेसोबत स्क्रीन शेअर केली होती. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा अनेकांना पसंत पडला होता. तर लवकरच श्रेयसचा इमर्जन्सी आहे सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात तो अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. तर 'पुष्पा 2' सिनेमाचं हिंदी डबिंगही तो करतोय.

तर श्रेयस याआधीच एक जीवघेण्या घटनेतून बचावला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला पण डॉक्टरांच्या योग्य उपचारामुळे तो यातून सावरला आणि सध्या तो त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देतोय. सोशल मीडियावरही त्याने त्याचा हा अनुभव शेअर केला होता. त्याने काही काळ शुटिंगमधून ब्रेक घेतला असून तो त्याच्या कुटूंबासोबत टाईम स्पेंड करतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिखलदऱ्याला जाण्यापूर्वी ही बातमी वाचा! वीकेंडला वनवे नियम लागू; प्रशासनाचा मोठा निर्णय

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा

Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मोठा दणका! अस्वच्छता आणि नियमभंगामुळे सहा हॉटेलांचे परवाने निलंबित, ७० हॉटेलांची तपासणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहराबाहेर नेण्याचा घाट कुणासाठी? बच्चू कडू अन् संजय खोडके आक्रमक, सरकारला विचारला संतप्त सवाल

Pune News: कोट्यवधींचा खर्च, तरी गळके छत! कोथरूड स्मशानभूमीचा व्हिडिओ व्हायरल; पुणे महापालिकेची धावपळ

SCROLL FOR NEXT