Kartik Aaryan sakal
Premier

Kartik Aaryan: उंदरांमुळे कार्तिक आर्यनचं लाखोंचं नुकसान; नेमकं प्रकरण काय?

Bollywood News: कार्तिकनं नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत कार्तिकनं त्याच्या कारबद्दल सांगितलं.

priyanka kulkarni

Kartik Aaryan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्या त्याच्या 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. कार्तिकसाठी हा चित्रपट खास आहे. कारण या चित्रपटासाठी कार्तिकनं बरीच मेहनत घेतली आहे. अशातच कार्तिक 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. कार्तिकनं नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत कार्तिकनं त्याच्या कारबद्दल सांगितलं.

उंदरांमुळे कार झाली खराब

बॉलिवूडमधील 13 वर्षांच्या करिअरमध्ये कार्तिक आर्यनने अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. 'भूल भुलैया 2' या हिट चित्रपटानंतर टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी कार्तिकला 4 कोटी 70 लाख रुपयांची एक मॅक्लारेन कार भेट दिली. कार्तिक आर्यनच्या मॅक्लारेन कारचा रंग केशरी आहे. या कारमध्ये कम्फर्ट मोड, स्पोर्ट मोड आणि तिसरा म्हणजे ट्रॅक मोड आहेत. मात्र दुर्दैवाने उंदरांनी ही कार खराब केली.

कार्तिक आर्यनने The Lallantop या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतात आलेली ही पहिली मॅक्लारेन कार आहे. ही कार त्यानं काही वेळ चालवली आणि नंतर गॅरेजमध्ये पार्क केली होती. पण उंदरांनी त्याच्या कारच्या मॅट्स कुरतडल्या आणि अनेक गोष्टींचे नुकसान केले. कार्तिकने सांगितले की, "ही कार दुरुस्त करण्यासाठी मला लाखो रुपये खर्च करावे लागले."

चंदू चॅम्पियन या चित्रपटानंतर कार्तिक हा 'भूल भुलैया 3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Quetta Train Blast : पाकिस्तान हादरले ! लष्करी जवानांच्या रेल्वेवर BLA चा आत्मघातकी हल्ला, २३ ठार, ५३ गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tech Tips : रिमोटने बंद केल्यानंतरही का सुरू राहते Smart TV ची लाल लाइट? जाणून घ्या वीजबिल वाढवणारा सिक्रेट खेळ

Pimpri: ‘पीएमपी’च्या मर्यादा; खासगी वाहने सुसाट;बससंख्या अपुरी, दुपारी लोकल नाहीत अन् मेट्रोही ठरावीक; अपघातांच्या संख्येत वाढ

'मी माझे एग्ज फ्रीज केलेत...' राखी सावंत म्हणाली की, 'माझ्या आईने मला सांगितलंय की...'

SCROLL FOR NEXT