Chandu Champion Esakal
Premier

Chandu Champion: पुणेकरांसाठी कार्तिकची मराठीत पोस्ट ; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Kartik Aaryan Social media post: अभिनेता कार्तिक आर्यनच्या मराठी पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे कार्तिकच्या चंदू चॅम्पियन सिनेमाची चर्चा आहे. स्पोर्ट्स ड्रामा असलेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय आणि कार्तिकच्या परफॉर्मन्सचंही सगळेचजण कौतुक करत आहेत. सध्या कार्तिक या सिनेमाच्या पोस्ट प्रोमोशनमध्ये बिझी आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या पुणेकर चाहत्यांसाठी मराठीत पोस्ट शेअर केली ती व्हायरल झाली.

कार्तिकची पोस्ट

कार्तिक नुकताच सिनेमाच्या प्रोमोशन निमित्त पुण्याला गेला. पुण्यती एका मॉलमध्ये चाहत्यांबरोबर कार्तिकचा मीट अँड ग्रीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाने तो भारावून गेला आणि त्याने सोशल मीडियावर मराठीत पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले. "तुमचा चंदू चॅम्पियन एवढं प्रेम बघून खूप खूप खूष झाला!
कोटी कोटी धन्यवाद Pune ❤️❤️" अशी पोस्ट त्याने शेअर केलीये सोबत त्याने पुण्यातील इव्हेन्टची झलक शेअर केली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

कार्तिकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं. "तू नॅशनल अवॉर्डसाठी पात्र आहेस", "तू खूप उत्तम अभिनेता आहेस","लोकांचा सुपरस्टार" अशा अनेक कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. इतकंच नाही तर नेपोटीझम आणि इंडस्ट्रीतील राजकारण डावलून त्याने मिळवलेल्या यशाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

सिनेमाची कथा

पॅरालिम्पिक विजेते असलेल्या मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सैन्य अधिकारी असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना १९६५च्या लढाईत अपंगत्व आलं. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिक मध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवलं. त्यांचा हा सगळा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार असून सिनेमाच्या ट्रेलरनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिनेमाची कमाई

चंदू चॅम्पियनने तीन दिवसात २० करोडची कमाई केली. सिनेमाची ओपनिंग संथ झाली असली तरीही नंतरच्या दोन दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ५.४ करोड इतकी कमाई केली आणि नंतरच्या दोन दिवसात १५ करोडची कमाई करण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT