Premier

Chandu Champion : खऱ्या चंदूच्या उपस्थितीत पार पडला सिनेमाचा प्रीमियर ; स्वतःचा प्रवास पडद्यावर बघून मुरलीकांत पेटकरांना अश्रू अनावर

Chandu Champion Premier : चंदू चॅम्पियन सिनेमाचा प्रीमियर नुकताच सैन्य अधिकारी आणि मुरलीकांत पेटकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सिनेमा पाहताना मुरलीकांत आणि त्यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले.

सकाळ डिजिटल टीम

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या चंदू चॅम्पियन या सिनेमाची चर्चा गेला बराच काळ सगळीकडे सुरु आहे. या सिनेमाचा ट्रेलर चांगलाच गाजला आणि १४ जून २०२४ ला हा सिनेमा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

नुकताच या सिनेमाचा प्रीमियर सैन्य अधिकारी, मुरलीकांत पेटकर यांचे कुटूंबीय आणि स्वतः मुरलीकांत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी स्वतःचा स्ट्रगल रुपेरी पडद्यावर पाहून मुरलीधर यांना अश्रू अनावर झाले.

नुकतंच सोशल मीडियावर चंदू चॅम्पियन सिनेमाच्या स्पेशल प्रीमियरचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये शेवटचा स्विमिंग कॉम्पिटिशनमधील सीन बघताना मुरलीधर आणि त्यांचा मुलगा अर्जुन यांना अश्रू अनावर झाले. अर्जुन दिग्दर्शक कबीर खान यांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडला तर कार्तिकच्या हातात हात देत मुरलीधर यांच्या डोळ्यातही पाणी तरळलं.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत या बॉण्डचं कौतुक केलं.

सिनेमाची कथा

पॅरालिम्पिक विजेते असलेल्या मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सैन्य अधिकारी असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना १९६५च्या लढाईत अपंगत्व आलं. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिक मध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवलं. त्यांचा हा सगळा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार असून सिनेमाच्या ट्रेलरनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कार्तिकची फिटनेसवर मेहनत

अभिनेता कार्तिक आर्यनने ही भूमिका साकारण्यासाठी बरंचसं वजन कमी केलं. या सिनेमासाठी त्याने त्याच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आणि अनेक स्पोर्ट्सचा सराव केला. इतकंच नाही तर त्याने या सिनेमासाठी वर्षभर गोड खाणं टाळलं.

या सिनेमाचं दिग्दर्शन 83 सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी केलं आहे. 83 च्या अपयशानंतर ते डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. हा सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांपैकी बेस्ट सिनेमा होता असं त्यांनी यावेळी मुलाखतीमध्ये म्हंटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: भले शाब्बास! छत्रपती संभाजीनगरचा तेजस शिर्से फायनलमध्ये; पदकासाठीचा सामना केव्हा होणार घ्या जाणून

भरती प्रक्रियेतून निवड झाली, पण ३ महिन्यांपासून नियुक्तीची प्रतीक्षा; पात्र उमेदवारांचा जीव टांगणीला

Latest Marathi News Live Update: मालवीय नगर आगीच्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेला आचारी केसर नेगी याला जामीन मंजूर

गावातील राजकारण आणि 'अवली'चा नवा संघर्ष; 'सौभाग्यवती सरपंच २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ट्रेलर!

आधी अलिबाग, आता वर्सोवा! विराट-अनुष्काने मुंबईत घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT