Premier

Govinda : कश्मिराने गोविंदाची पाया पडून मागितली माफी; अभिनेत्याच्या कृत्यामुळे तिच्या डोळ्यात आलं पाणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंहचं २५ एप्रिलला दीपक चौहानसोबत लग्न झालं. तिचा भाऊ कृष्णासोबत असलेल्या वादामुळे गोविंदा या लग्नाला उपस्थित राहणार का याबद्दल सगळेचजण साशंक होते पण गोविंदाने या लग्नाला हजेरी लावत भाचीला आशीर्वाद दिले. गोविंदासोबत त्याचा मुलगा यशवर्धननेही या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी गोविंदाने कृष्णाच्या दोन्ही मुलांची भेट घेत त्यांनाही आशीर्वाद दिले.

आरतीने २५ एप्रिलला बिझनेसमन दीपक चौहानसोबत इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधली. आरतीच्या या लग्नाला गोविंदाच्या उपस्थितीची चर्चा सध्या सिनेजगतात सुरु आहे. त्याच्या हजेरीमुळे त्याचं आणि त्याचा भाचा कृष्णामधील भांडण संपलं असल्याचं म्हंटलं जातंय. कृष्णाची पत्नी कश्मिरा आणि गोविंदाची पत्नी सुनीता यांच्यात शाब्दिक वाद झाले होते आणि त्यानंतर हा वाद बराच चिघळला होता. त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं. पण त्यानंतर कृष्णाने बऱ्याचदा गोविंदाची माफी मागण्याचा प्रयत्न केला.

आरतीच्या लग्नाआधी पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीत कश्मिराने गोविंदा जर या लग्नाला उपस्थित राहिले तर मी त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेईन असं म्हंटलं होतं आणि लग्नाला गोविंदा उपस्थित राहिल्यानंतर कश्मिराने तिचं वचन पाळलं. तिने गोविंदाच्या पाया पडताच त्याने तिला 'खुश रहो जिते रहो' म्हणत आशीर्वाद दिले तर कृष्णाच्या दोन्ही मुलांना जवळ घेत त्यांनाही आशीर्वाद दिले. या दृश्यामुळे कश्मिराच्या डोळ्यात पाणी आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नुकतंच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कश्मिराने तिच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली,"मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना स्टेजवर घेऊन गेले. जेव्हा मी त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले तेव्हा मामांनी मला थांबवलं आणि ‘जीते रहो, खुश रहो.’ असं म्हटलं. मी त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. हीच माफी आहे. " या लग्नाला गोविंदाची पत्नी सुनीता उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबत कश्मिरा म्हणाली की," त्या येणार नाहीत हे त्यांना माहित होतं आणि त्यांचा आमच्यावर रागावण्याचा पूर्ण हक्क आहे."

काही वर्षांपूर्वी गोविंदाने एका निर्मात्यावर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्याचदरम्यान 'लोकं पैशासाठी कुठेही नाचतात' असं ट्विट कश्मिराने केलं होतं. यावरून कश्मिरा आणि सुनीता यांच्यामध्ये वाद झाला होता आणि दोन्ही कुटूंबांच एकमेकांशी बोलणं थांबलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending News : आई म्हातारी झाली पण मुलगा माणूस झाला नाही! कोर्टात गाजली करूण कहाणी; न्यायाधीश म्हणाले, मला लाज वाटते...

71st National Award: 'नाळ', 'आत्मपॅम्फ्लेट'ची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर; तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला... दिग्दर्शकाचा आनंद गगनात मावेना

ZIM vs NZ 1st Test : न्यूझीलंडने ८ धावा करून कसोटी जिंकली, तीन दिवसांत प्रतिस्पर्धीची वाट लावली! Matt Henryच्या ९ विकेट्स

Cyber Crime : शेअर बाजार, ऑनलाइन जॉबच्या आमिषाने ४५ लाख रुपयांची केली फसवणूक

Triglycerides: कोलेस्ट्रॉलसारखेच धोकादायक ट्रायग्लिसराइड! हृदयात ब्लॉकेज निर्माण करणाऱ्या 'या' 5 सवयी टाळा

SCROLL FOR NEXT