Shefali Jariwala inspiring journey against Epilepsy 
Premier

Shefali Jariwala : शेफाली जरीवाला करत होती या आजाराचा सामना; करिअरमधूनही घ्यावा लागलेला ब्रेक

Shefali Jariwala Had This Disease For Many Years : अभिनेत्री आणि डान्सर शेफाली जरीवालाचं निधन झालं. लहानपणापासून ती एका आजाराचा सामना करत होती. या आजारावर तिने कशी मात केली जाणून घेऊया .

kimaya narayan

News : २००० च्या दशकात आलेल्या 'काँटा लगा' या पहिल्या रिमिक्स गाण्यामुळे अभिनेत्री शेफाली जरीवाला घराघरात पोहोचली. तिचा डान्स, तिची अदा यामुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली आणि 'काँटा लगा' गर्ल या नावाने ती फेमस झाली. शेफालीचं काल निधन झालं. तिचं वय 42 वर्षं होतं. एका मुलाखतीत तिने तिच्या जुन्या आजारपणाविषयी सांगितलं.

'काँटा लगा' नंतर शेफालीने अनेक डान्स नंबर्स केले पण त्यानंतर ती बराच काळ इंडस्ट्रीपासून दूर होती. एपिलेप्सी मुळे ती फार काम करू शकली नाही असं तिने एका मुलाखतीमध्ये शेअर केलं. तर बिग बॉस १३ मधील तिचा घरातील वावरही अनेकांना आवडला.

पारस छाबराला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेफालीने तिचा एपिलेप्सीतुन बरा होण्याचा प्रवास शेअर केला. ती म्हणाली,"मी पंधरा वर्षांची होते तेव्हा मला पहिल्यांदा फिट आली. त्यानंतर मला एपिलेप्सी असल्याचं समजलं. हा एक आजार आहे जो मेंदूमधील काही बिघाडांमुळे होतो. सुरुवातीला मला त्रास झाला. जेव्हा जेव्हा मी तणावात असायचे तेव्हा मला त्रास व्हायचा पण नंतर योग्य डाएट, व्यायाम, औषध आणि उपचार यांच्यामुळे मी आजारावर मात केली. गेली २२ वर्षं मला फिट आलेली नाहीये. या आजारावर अजूनही संशोधन सुरु आहे पण याबाबत लोकांमध्ये जागरूकता नाहीये. त्यामुळे लोक अंगात देवी येते किंवा मिरगी येते असं म्हणतात. नाकाला कांदा लावतात पण त्याने काही होत नाही."

या आजारात अध्यात्माने खूप मदत केली असंही ती म्हणाली. या सगळ्याच श्रेय तिने तिच्या आजीला दिल. ती म्हणाली,"माझ्या आजीमुळे मी अध्यात्माच्या मार्गावर आले. तिने लहानपणापासून देवावर विश्वास ठेवायला शिकवलं. त्यामुळे माझा या गोष्टीवर विश्वास बसला आणि आज मी जे काही कमावलंय ते याच जोरावर कमावलं आहे. "

बिग बॉस १३ मध्ये शेफाली एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून पुढे आली होती पण नंतर ती या स्पर्धेतून बाहेर पडली. तिचा सिद्धार्थ शुक्ला आणि आसीम रियाझशी असलेला बॉण्ड सगळ्यांना आवडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT