Premier

'भाग्य दिले...' नंतर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची पोस्ट चर्चेत

This serial on Colors Marathi going to off air soon : कलर्स मराठीवरील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोणती आहे ती मालिका जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षभरात अनेक नवीन मालिका टीव्ही चॅनेल्सवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि टीआरपीच्या शर्यतीत मागे राहणाऱ्या मालिका ताबडतोब बंदही केल्या जात आहेत. मालिकांच्या कथानकापेक्षा टीआरपीला महत्त्व देत असल्याने प्रेक्षकही काहीसे नाराज आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या काही काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आणि अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता आणखी एक मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

कलर्स मराठीवर नुकतीच दोन नव्या मालिकांची घोषणा केली. 'अंतरपाट', 'अबीर गुलाल' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु या मालिका कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. पण काव्यांजली मालिकेतील कलाकारांच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेत्री कश्मिरा आणि यामधील मुख्य अभिनेता पियुष रानडे यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पियुषने मेकअपरुममधील व्हिडीओ स्टोरीमध्ये त्यावर “विश्वजीत म्हणून शेवटचे काही दिवस…खूप खूप आभार” असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय कश्मिराने सुद्धा “काव्या म्हणून शेवटचे काही दिवस” अशी स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची सुरुवात झालीये.

अवघ्या वर्षभरातच काव्यांजली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुरुवातीला या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता पण सध्या याचा टीआरपी बराच खाली गेलाय. पण अजून कलर्स मराठी वाहिनीने याबाबत अधिकृत घोषणा केली नाहीये.

‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ या दोन नवीन मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'अबीर गुलाल' मध्ये गायत्री दातार दिसणार आहे तर 'अंतरपाट' या मालिकेत रश्मी अनपट वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT