ketaki chitale sakal
Premier

Ketaki Chitale: जातपात सोडा हिंदूंनो... केतकी चितळेने शेअर केला जरांगेचा फोटो नाचवणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्याचा व्हिडिओ

Ketaki Chitale Shared Controversial Post: मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य करत एक जरांगे पाटील यांच्याशी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे.

Payal Naik

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमीच तिची मतं स्पष्टपणे मांडताना दिसते. तिच्या कामापेक्षा ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. महाराष्ट्रातील राजकारणावर आणि इतर परिस्थितीवर ती नेहमीच भाष्य करत आली आहे. त्यामुळे ती अनेकदा ट्रोलही होताना दिसते. आताही केतकीने केलेली एक पोस्ट नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. तिने मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घेऊन घोषणा देणाऱ्या एका मुस्लिम कार्यकर्त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

केतकीने शेअर केला व्हिडिओ

मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. केतकी कायमच त्यांच्यावर टीका करत आली आहे. आता पुन्हा एकदा तिने व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात मुस्लिम कार्यकर्ते हिरव्या रंगाचा झेंडा तसंच मनोज जरांगे पाटलांचा फोटो घेऊन एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देताना दिसत आहेत. केतकीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं, 'हातात कोणाच्या कठपुतळीचा फोटो आहे ते बघा. जातपात सोडा. हिंदूंनो, आपण जर एकत्र झालो नाही तर आपल्या घरासमोर हिरवळ दिसायला फार काळ लागणार नाही...'

तिने पुढे लिहिलं, 'आपल्याला अशी हिरवळ पाहायची नसेल तर जातपात सोडा. आपण विसरलो आहोत म्हणून यांचं फावतं आहे. धर्मनिरपेक्षता बाजूला ठेवा. धर्म वाचवण्यासाठी कामाला लागा नाहीतर उद्या आपली पोरं बाळं अल्ला हू अकबर करू लागतील. जय हिंद.' तिच्या या पोस्टवर अनेक नेटकरी तिला सुनावताना दिसत आहेत. तिची ही पोस्ट आता व्हायरल होताना दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

Year End Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला मोठं फळ देणारा योग! कल्याणासाठी ‘या’ वस्तू दान करायला विसरू नका

Ashes Series : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली; दोन दिवसांत सामना संपल्यामुळे नुकसानीची भीती

Pune Municipal Election : मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या मुलांचे पत्ते कट; शनिवारी रात्री आले आदेश

SCROLL FOR NEXT