ketaki chitle  esakal
Premier

Ketaki Chitale: आपल्या मुली गायब होतात अन् फ्रिज, कपाटात... यशश्री हत्याप्रकरणावर केतकी चितळेचा संताप, म्हणते-

Ketali Chitale On yashashree Shinde Murder Case: नवी मुंबईत एका २० वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावर आता अभिनेत्री केतकी चितळे हिने संताप व्यक्त केला आहे.

Payal Naik

नवी मुंबई येथील उरणमध्ये राहणारी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिला अतिशय वाईट पद्धतीने मारण्यात आलं. तिला न्याय मिळावा यासाठी उरणमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. सोशल मीडियावरही याप्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. नेटकरी आणि नागरिक दोन्ही या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिनेदेखील याप्रकरणी पोस्ट केली आहे. तिने एक पोस्ट करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. सोबतच यशश्रीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. केतकीने पोस्ट करत लव्ह जिहादचा मुद्दाही मांडला आहे.

केतकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच तिचं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. अनेक मुद्द्यांवर ती व्यक्त होते. आताही तिने या विषयी भाष्य करत राग व्यक्त केला आहे. केतकीने यशश्री हत्याप्रकरणी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'लव्ह जिहाद फक्त बिहारमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त केरळमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त पश्चिम बंगालमध्ये होतोय, हे खोटं आहे. लव्ह जिहाद फक्त मुस्लिमांचा प्रभाव असेलल्या राज्यात होतोय हे खोटं आहे. लव्ह जिहादचं प्रमाण फक्त ग्रामीण भागात आहे, हे खोटं आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिला लव्ह जिहादला बळी पडताय, हे खोटं आहे. जिथं जिथं हिंदू आहेत तिथं तिथं लव्ह जिहाद आहे.'

तीन पुढे म्हटलं, 'आपल्या मुली गायब होतायत. कधी फ्रीजमध्ये सापडतात, कधी कपाटात ,तर कधी समुद्रात. नाही तर सुटकेसमध्ये. पूर्वी लोक स्वातंत्र्यासाठी लढले. आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे. पोलिस आपल्या बाजूने नाहीत. प्रशासन आपल्या बाजूनं नाही. आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे.' तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT