khloe kardashian  sakal
Premier

khloe kardashian: हसावं की रडावं? इंडस्ट्रीतील टॉप डिझायनर मनीष मल्होत्राला क्लोई कार्दीशियन म्हणाली लोकल; नेटकरी म्हणतात...

Khloe Kardashian On Manish Malhotra: क्लोई कार्दीशियन हिच्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तिने मनीष मल्होत्राचा लोकल डिझायनर म्हणून उल्लेख केला आहे.

Payal Naik

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधली. या लग्नाला बॉलिवूडसोबतच हॉलिवूड कलाकारही हजर होते. या लग्नात आलेल्या हॉलिवूड कलाकारांपैकी एक होत्या कार्दीशियन सिस्टर्स. किम आणि क्लोई कार्दीशियन यांनी मुंबईत अंबानींच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांनी रिक्षामध्ये बसून त्यांची इच्छाही पूर्ण करून घेतली. त्यांच्या भारतात येण्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. त्यातही अनेक नेटकऱ्यांनी क्लोई राखी सावंत सारखी दिसते असंही म्हटलं होतं. आता क्लोई तिच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने इंडस्ट्रीतील टॉप डिझायनर मनीष मल्होत्राला चक्क लोकल डिझायनर म्हटलं आहे.

अंबानींच्या लग्नात क्लोई आणि किम या दोघीनींही मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले घागरे परिधान केले होते. क्लोईला तिचा घागरा विशेष आवडला. तिने तिच्या इंस्टाग्रामवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती असं काही बोलली ज्यामुळे नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला. या व्हिडिओमध्ये क्लोई म्हणते, 'हे, सगळ्यांनी बघा माझे कपडे किती सुंदर आहेत. मी इथल्या लोकल डिझायनरने डिझाइन केलेला लेहेंगा घातला आहे. मी तुम्हाला त्याच्या नावासोबत सगळ्या डिटेल्स देईन. इतक्या बारीक पद्धतीने काम केलं आहे. हे खूप सुंदर आहे. मला हा गुलाबी रंग खूप आवडला आहे.' पण तिचं हे बोलणं नेटकऱ्यांना मात्र मुळीच आवडलेलं नाही.

khloe kardashian

एका नेटकऱ्याने यावर प्रतिक्रिया देत लिहिलं, 'क्लोई कार्दीशियन म्हणते की तिचा लेहेंगा हा लोकल डिझायनरने बनवलाय आणि हे ऐकून मला चक्कर येतेय.' आणखी एकाने लिहिलं, 'बघा त्यांना आपल्याबद्दल किती कमी माहिती असते. ती बेस्ट डिझायनरला लोकल डिझायनर म्हणतेय. आपण या लोकांना खूप जास्त महत्व देतो.' आणखी एकाने लिहिलं, 'काय वेळ आलीये. तिने मनीष मल्होत्राला लोकल म्हटलं.' तिच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT