kiara advani & vicky kaushal sakal
Premier

kiara Advani: 'तिचा मी आदर करतो आणि तिच्या कामावर मी खूप प्रभावित आहे', विकीने केली कियाराची स्तुती!

Now they've teamed up for Bad News: ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून यादरम्यान विकीने कियाराची खूप स्तुती केली.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal: अभिनेत्री कियारा अडवानीने आतापर्यंत मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे. तिचा असा एक वेगळा चाहतावर्ग आहे. सिद्धार्थ मल्होत्राशी लग्नगाठ बांधल्यानंतर ती चित्रपटांमध्ये काहीशी कमी दिसत आहे, मात्र आता तिचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

या चित्रपटामध्ये ती अभिनेता विकी कौशलबरोबर काम करीत आहे. यापूर्वी त्यांनी ‘लस्ट स्टोरीज’मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट कियारासाठी टर्निंग पाॅईंट ठरला होता. आता ‘बॅड न्यूज’साठी ते एकत्र आलेले आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. यादरम्यान विकीने कियाराची खूप स्तुती केली.

तो म्हणाला, की कियारा इंडस्ट्रीतील माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक आहे. मी तिच्यावर एक माणूस म्हणून प्रेम करतो आणि मी तिच्यावर एक अभिनेता म्हणून प्रेम करतो. आम्ही अनेकदा बोलत नाही आणि भेटत नाही, पण मला तिच्यासोबत ‘लस्ट स्टोरीज’मध्ये काम करायला आवडले आणि मी तिच्यासोबत ‘गोविंदा नाम मेरा’मध्ये काम केले.

तो पुढे म्हणाला, ‘‘तिच्यासोबत काम करताना मला वेगळीच मजा वाटते. आमचे ऑनस्क्रीन बाॅण्डिंग खूप छान आहे. तिचा मी आदर करतो आणि तिच्या कामावर मी खूप प्रभावित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT