Kim Kardashian Esakal
Premier

Kim Kardashian : अनंत-राधिकाच्या लग्नानंतर किम आणि क्लोईची मंदिरात सेवा ; फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल

Kim Kardashian & her sister donate food in temple : हॉलिवूड स्टार किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लोईने अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर मुंबईतील इस्कॉन मंदिरात सेवा केली.

सकाळ डिजिटल टीम

Kim Kardashian & Kloe Kardashian : हॉलिवूड स्टार किम कर्दशियन आणि तिची बहीण ख्लोने अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत हजेरी लावली. अनंत-राधिकाच्या लग्नातील तिचे आणि तिच्या बहिणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर किम आणि तिच्या बहिणीने संपूर्ण मुंबई फिरली.

इतकंच नाही तर किमने मुंबईत रिक्षाने फिरण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा पूर्ण झाली. याबरोबरच तिने लग्नामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजबरोबर फोटोही काढले. किमच्या भारत दौऱ्याची चर्चा सोशल मीडियावरही होतेय. त्यातच आता किमचे नवीन काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये तिने तिची बहीण ख्लोबरोबर मुंबईतील इस्कॉन मंदिराला भेट दिली. तिथे तिने दर्शन घेतलं. यावेळी तिच्याबरोबर लाईफ कोच जय शेट्टीसुद्धा उपस्थित होते.

किम आणि ख्लोने फक्त दर्शनच घेतलं नाही तर त्यांनी तिथे सेवाही केली. त्या दोघीनी तिथे उपस्थित असलेल्या लहान मुलांना जेवण वाढलं. सोशल मीडियावर या दोघींचे जेवण वाढतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या या कृतीने तिचे भारतीय फॅन्स खूप खुश झाले.

पहा फोटो:

अंबानींच्या लग्नात धमाल

किमने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न आणि शुभ आशीर्वाद या दोन कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजची भेट घेतली. तिने ऐश्वर्या राय बच्चन बरोबर फोटो काढला आणि या फोटोला तिने 'क्वीन' असं कॅप्शन दिलं होतं. तिने शेअर केलेला हा फोटो चर्चेत होता. तर तिने महेश बाबू आणि रणवीर सिंह यांच्याबरोबर देखील फोटो काढले होते.

या लग्न समारंभात किमचं खूप जोशात स्वागत झालं. नीता अंबानी यांनी किमचा हात धरून तिला लग्न मंडपापर्यंत आणलं होतं. हॉलिवूडमधून आलेल्या अनेक कलाकारांपैकी फक्त किम आणि लॉरेन स्कवॉर्ट्जला हा सन्मान मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT